लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! ₹१५०० 'या' दिवशी खात्यात जमा होणार? आजच्या बैठकीत सप्टेंबर हप्त्याबाबत निर्णय?

Ladki Bahin Yojana September Installment: लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर हप्त्याची १ कोटी ६६ लाख महिला वाट पाहत आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ₹१५०० हप्ता कधी जमा होणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On: 

Ladki Bahin Yojana September installment payment date : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची लाखो महिला उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आज ६ ऑक्टोबर तारीख उजाडली असली, तरी अद्याप सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता (September Installment Date) लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. मात्र, आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) यावर अतिशय महत्त्वाचा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (Ladki Bahin September installment date)

मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा (Drought Situation Review) घेतला जाईल. त्याचबरोबर, लाडकी बहीण योजनेचा हप्ता (Ladki Bahin Yojana Installment) नेमका कधी वितरित करायचा? यावर सविस्तर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana
ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता 'या' दिवशी होणार जमा, वाचा मोठी अपडेट

नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर मिळणार भेट?

राज्य सरकारने यापूर्वीचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते देखील विविध सणांचे औचित्य साधूनच महिलांच्या खात्यात जमा केले होते. सध्या नवरात्री (Navratri Festival) उत्सवाची तयारी सुरू असून लवकरच दसरा (Dussehra) येत आहे. सणासुदीच्या या काळात महिलांना आर्थिक मदत (Financial Assistance) व्हावी, या दृष्टीने सरकार २५ तारखेनंतर महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात करू शकते. टप्प्याटप्प्याने (Phase-wise Distribution) सर्व पात्र महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

१ कोटी ६६ लाख महिलांना होणार फायदा

या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र लाडक्या बहिणींना (Eligible Beneficiaries) लाभ मिळणार आहे. सरकार थेट बँक हस्तांतरण म्हणजेच 'डीबीटी' (Direct Benefit Transfer - DBT) प्रणालीद्वारे १५०० रुपये थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com