दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Dandiya Accident: हैदराबादमधील एमव्हीएसआर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दांडिया कार्यक्रमादरम्यान दिव्यांचा लोखंडी सांगाडा कोसळला. या दुर्घटनेत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले.
Hyderabad College Dandiya Accident Engineering Student Dies
Hyderabad College Dandiya Accident Engineering Student Dies Saam TV
Published On: 

MVSR Engineering College Dandiya accident latest news : हैदराबादमधील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दांडियाच्या उत्सवादरम्यान एक भयंकर दुर्घटना घडली. उत्सवाचा आनंद सुरू असताना अचानक स्टेजवरील दिव्यांचा आणि लाईट्सचा मोठा लोखंडी सांगाडा कोसळला. हा लोखंडी सांगडा काही विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळला. या दुर्दैवी घटनेत पहिल्या वर्षात शिकणाऱ्या एका इंजिनिअरिंगच्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर १७ पेक्षा जास्त विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे कॉलेज कॅम्पसमध्ये एकच धावपळ आणि आरडाओरडा झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

शनिवारी रात्री एमव्हीएसआर (MVSR) इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. आदिबटला येथील नादेरगुल कॉलेज कॅम्पसमध्ये शनिवारी संध्याकाळी ७:३० वाजता विद्यार्थी दांडियाचा आनंद घेत होते. यादरम्यान अचानक मंचावरील दिव्यांची मोठी धातूची चौकट थेट विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळली. या भीषण दुर्घटनेत एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. १७ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेत मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव सोना असल्याचे समोर आले आहे. आदिबटला पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. रमेश यांनी ही माहिती दिली.

Hyderabad College Dandiya Accident Engineering Student Dies
Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, त्यात लोखंडी सांगाडा विद्यार्थ्यांवर कोसळताना दिसत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, या दुर्दैवी दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या दोषी लोकांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. रेवंत रेड्डी यांनी शोकाकुल कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

Hyderabad College Dandiya Accident Engineering Student Dies
Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

घटना कशी घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या मैदानावर एका भागात विशेष मंच उभारण्यात आला होता. या मंचाची सजावटीचे दिवे लावण्यासाठी एक मोठी धातूची चौकट (लोखंडी सांगाडा) उभारण्यात आली होती, तर मैदानावर इतरत्रही तशीच दुसरी रचना उभारण्यात आली होती. उत्सव सुरू असताना अचानक ही जड धातूची चौकट विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळली.

Hyderabad College Dandiya Accident Engineering Student Dies
Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

इतर विद्यार्थ्यांची स्थिती काय?

घटना घडताच कॉलेजचे कर्मचारी आणि इतर विद्यार्थ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केले. निरीक्षक एस. रमेश यांनी सांगितले की, या दुर्घटनेत जखमी झालेले १७ विद्यार्थी सुरक्षित असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच, एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणखी एका मुलीच्या प्रकृतीबाबतही पोलीस सद्यस्थितीत चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com