Gold price drop : सोनं प्रतितोळा ५५ ते ६० हजारांवर येणार? ही आहेत कारणं...
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण सोन्याने जो उच्चांक गाठला होता त्या किंमतीत तब्बल दहा टक्के घट झालीय. सोनं हे विक्रमी उच्चांकावरून ९२,००० रुपयांवर आलंय. जागतिक बाजारातही सोन्याचे भाव घसरले आहेत. ग्लोबल ट्रेड वॉरमध्ये घट आणि सुरक्षित मालमत्तेच्या मागणीत घट या दोन कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत ही घसरण झाल्याचं सांगितलं जातंय. बाजारातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार सोन्याचे भाव आता आणखी घसरणार आहेत. त्यामुळे येत्या काळात सोन्याचा भाव ५५ ते ६० हजार प्रतितोळ्यावर येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सोन्याचे दर घसरण्यामागची कारणं काय आहेत पाहूयात
भारत-पाकिस्तान या दोन देशांत युद्धबंदीची घोषणा झाली.
डॉलर मजबूत झाला आणि त्यामुळं सोन्याची मागणी घटली.
अमेरिका-चीनमधील टॅरिफ वॉर निवळलं.
शेअर बाजारात तेजी आली. सोन्यातील गुंतवणूक कमी झाली.
सोन्याच्या दरांत घट नोंदवली गेली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
