Surabhi Jayashree Jagdish
उन्हाळ्यात घराची अधिक स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं. या दिवसांत बेडरूम आणि बेडवरील वस्तू स्वच्छ ठेवाव्यात. चादर स्वच्छ असल्यास बेडवर झोपणं अधिक आरामदायी वाटतं.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीराला जास्त घाम येतो. हा घाम बेडवरील चादरीला लागल्याने ती लवकर घाण होऊ शकते. त्यामुळे चादरीच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष द्यावे.
बेडवरील चादर वेळोवेळी बदलणं गरजेचं असतं. चादर घाण झाली असेल तर ती लगेच बदलावी. स्वच्छ चादर वापरल्यामुळे बेड स्वच्छ ठेवण्यास मदत होते.
उन्हाळ्यात बेडवरील चादर साधारणपणे आठवड्यातून एकदा धुवावी. यामुळे चादरीवर जमा होणारा घाम आणि घाण काढण्यास मदत होते. चादर धुतल्यानंतर ती पूर्ण वाळवूनच पुन्हा बेडवर अंथरावी.
कधी कधी चादर आठवडाभरातच जास्त घाण होते. अशा वेळी आठवडा पूर्ण होण्याची वाट पाहू नये. चादर घाण दिसत असेल किंवा तिच्यावर डाग पडले असतील, तर ती लगेच धुवावी.
बेडवरील चादर किती लवकर घाण होते, हे तिच्या वापरावरही अवलंबून असतं. बेडवर अनेक लोक बसत किंवा झोपत असतील, तर चादर लवकर घाण होऊ शकते. त्यामुळे वापरानुसार चादर बदलण्याची वेळ ठरवावी.
काही लोकांना बेडवर बसून जेवण्याची सवय असते. त्यामुळे अन्नाचे कण, तेलाचे डाग किंवा इतर पदार्थ चादरीवर पडू शकतात. म्हणून शक्यतो बेडवर जेवणं टाळावं आणि चादर घाण झाल्यास ती लगेच धुवावी.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.