Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Marathi Breaking Live Headlines Updates : कोल्हापूरमध्ये गोकुळसाठी मतदान, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, महाराष्ट्रात पावसाचा इशारा, नवरात्रौउत्सव, राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

पुण्यातील सेव्हन लव्ह चौकात तरुणांच्या दोन गटांत तुफान हाणामारी

पुण्यातील सेव्हन लव्ह चौकात जुन्या वादातून तरुणांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांकडे अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसली, तरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठाणे न्यायालयात होणार आहे. कार्यालयीन त्रुटी दूर झाल्यानंतर हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे. कथित मानहानीकारक पोस्ट आणि व्हिडिओ हटवण्यासह संबंधितांनी सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी दाव्यात करण्यात आली आहे.

तसेच, २ हजार कोटी रुपयांची बँक गॅरंटी आणि मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात अंतरिम दिलासा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. सतीश सालियन यांच्या वतीने अधिवक्ता ईश्वरलाल अग्रवाल आणि तन्वीर निजाम न्यायालयात बाजू मांडणार आहेत. या दाव्यातील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!"

वन खात्यामध्ये आगामी काळात ऐतिहासिक आणि मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून, आगामी तीन वर्षांच्या कालावधीत वन खात्यात साधारणपणे २५ हजार ते ३० हजार लोकांची नवीन भरती केली जाणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या भरतीमुळे वन विभागाच्या कामकाजात अमुलाग्र बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास यादरम्यान व्यक्त करण्यात येत आहे.

धाराशिवमध्ये दुष्काळाची दाहकता, मेंढपाळांची मेंढ्यांना जगवण्याची धडपड

धाराशिव जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचे सावट आहे पाऊस नसल्याने नदी नाले कोरडेठाक पडले आहेत.तर जनावरांना हिरवा चारा देखील उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत अशातच मेंढपाळांना देखील आपल्या मेंढ्याना जगवण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. कर्नाटकातील विजापूर मधील मेंढपाळ धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत मात्र चारा व पाण्या अभावी त्यांचे देखील मोठे हाल होत आहे.सोयाबीनची काढणी झालेल्या शेतात पडलेला पालापाचोळा व मिळेल तिथे पाणी पाजुन या मेंढ्या जगवण्याची मेंढपाळ धडपड करत आहेत.

रत्नागिरी पोलिसांचे जवान सागरी सुरक्षेसाठी सज्ज; १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण!

सागरी सुरक्षेसाठी रत्नागिरी पोलीस दलाच्या क्विक रिस्पॉन्स टीमची सज्जता वाढवण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून भाट्ये समुद्रकिनारी १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीच्या वतीने आयोजित ‘मेन्यू-२७’ शिबिरात हे प्रशिक्षण पार पडले. ७ दिवस चाललेल्या या शिबिरात जवानांना बोट चालवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. सागरी आपत्कालीन परिस्थिती, बचावकार्य आणि किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे.

चिपळूणमधील ऐतिहासिक भूकंपमापक केंद्र झाडाझुडपांत हरवले

एकेकाळी भूकंपाच्या अभ्यासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे केंद्र आज झाडाझुडपांत हरवले आहे! चिपळूणमधील विंध्यवासिनी मंदिर परिसरात असलेली ही ऐतिहासिक वास्तू आता दुर्लक्षित अवस्थेत आहे. १० डिसेंबर १९६७ रोजी झालेल्या कोयना भूकंपानंतर भूगर्भातील हालचालींचा अभ्यास करण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आले होते. सुमारे दोनशे फूट खोल विहिरीसदृश रचनेतून भूगर्भातील कंपनांचा अभ्यास केला जात होता. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे केंद्र दुसरीकडे हलवण्यात आले आणि जुन्या वास्तूची देखभाल दुर्लक्षित राहिली. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या केंद्राचे जतन आणि संवर्धन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com