Gold Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक, १० तोळे सोनं १५८०० रुपयांनी वाढले, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. १० तोळे सोनं १५८०० रुपयांनी महाग झाले. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ६ रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा दर...

Priya More

Summary -

  • सोन्याने आज नवा उच्चांक गाठला

  • २४ कॅरेट १० तोळा सोनं १५,८०० रुपयांनी महाग

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली

  • चांदीच्या दरातही १ किलोमागे ६,००० रुपयांनी वाढ झाली

नवीन वर्षात सोन्याच्या दरात घट होईल असे अनेकांना वाटत होते. पण सोन्याचे दर कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५८० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात तब्बल ६ रुपयांनी वाढ झाली आहे. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वी तुम्ही आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते वाचून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दराने मोठा उच्चांक गाठला आहे. १ तोळा सोन्याचे दर १,३७,४०० रुपयांवर पोहचले आहेत. आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १५८० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,३७,४०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल १५,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,७४,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २४ कॅरेटसोबत २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १४५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,२५,९५० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १४,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,५९,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

तर २४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ११८० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,०३,०५० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ११,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १०,३०,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. आज सोनं खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार हे निश्चित आहे.

दरम्यान, सोन्यासोबतच आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ६ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २४७ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीच्या दरात तब्बल ६,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,४७,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Five color river: ही आहे जगातील रंग बदलणारी नदी, तुम्ही पाहिलीये का?

Maharashtra News Live Update: 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; 'या' महिलांवर कडक कारवाईचे संकेत

Heart Attack: सकाळी उठल्या उठल्या शरीरात 'हे' ६ बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका; असू शकतो हृदयविकाराचा झटका

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, मराठवाड्यावर सर्वात मोठं सकंट; हवामान विभागाच्या अंदाजाने धाकधूक वाढली

SCROLL FOR NEXT