Gold Price: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ७१०० रुपयांनी स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे. कारण सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते घ्या जाणून...
Gold Price: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ७१०० रुपयांनी स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर
Gold- Silver Price TodaySaam Tv
Published On

Summary -

  • सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली

  • सोन्यासोबत चांदीच्या दरात देखील मोठी घसरण

  • सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा

  • २४ कॅरेट १ तोळा सोनं ७१० रुपयांनी स्वस्त

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घट

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत होती. सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७१० रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार नाही. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ७१० रुपयांनी घट झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,४१,७१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोने ७१०० रुपयांनी स्वस्त झालं . हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,१७,१०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

Gold Price: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ७१०० रुपयांनी स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर
Gold Rate Prediction: सोनं प्रति तोळा ₹३,००,००० वर जाणार, अर्थतज्ज्ञांच्या भाकि‍ताने खळबळ

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ६५० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,२९,९०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं ६५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,९९,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

Gold Price: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ७१०० रुपयांनी स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर
Old Is Gold उमेदवारीचा भाजपचा फाॅर्म्युला ठरला, त्या नगरसेवकांना पुन्हा संधी|VIDEO

तर २४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घट झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ५४० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,०६,२८० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटचे १० तोळा सोनं ५४०० रुपयांनी स्वस्त झाले. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १०,६२,८०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

Gold Price: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ७१०० रुपयांनी स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर
Today Gold Rate : दरवाढीने पुन्हा रेकॉर्ड तोडला, सोनं आणखी महागलं, मुंबई-पुण्यात 24k, 22k, 18k सोन्याची किंमत काय?

दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २५८ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदी तब्बल ४,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,५८,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

Gold Price: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ७१०० रुपयांनी स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर
Todays Gold Rate : सुवर्णनगरीत दरवाढीचा भडका! २४ तासात सोनं ₹१९०० नं तर चांदी २३००० महागले, वाचा लेटेस्ट गोल्ड रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com