लग्नसराईत सोनं - चांदीला चकाकी, २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात किती रूपयांची वाढ? वाचा लेटेस्ट दर

Gold and Silver Prices Climb: लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदीच्या दरात वाढ. २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या भावात वाढ. चांदीही महागली.
Gold and Silver Prices Climb
Gold and Silver Prices ClimbSaam
Published On

सध्या अनेक ठिकाणी लग्नसराईची लगबग सुरू आहे. लग्नाच्या घरात सोनं हमखास खरेदी केली जाते. पण सोनं खरेदी करताना आजकाल ग्राहकांच्या खिशाला झळ बसते. याला कारण म्हणजे सोन्याच्या दरात होणारा चढता आलेख. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या भावात ८२० रूपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा फटका निश्चितच सामान्यांना बसतो.

आज १५ डिसेंबर २०२५. आज सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ८२० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,३४,७३० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ८,२०० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १३,४७,३०० रूपये मोजावे लागतील.

Gold and Silver Prices Climb
शेतीचा वाद विकोपाला! मोठ्यानं लहान भावाला संपवलं; मृतदेह जाळून नाल्यात फेकला, नागपूर हादरलं

२४ सह २२ कॅरेट सोन्याच्या भावातही वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७५० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२३,५०० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ७,५०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,३५,००० रूपये मोजावे लागतील.

२४, २२ सह १८ कॅरेट सोन्याच्या भावातही वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ६२० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,०१,०५० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ६,२०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १०,१०,५०० रूपये मोजावे लागतील.

Gold and Silver Prices Climb
महापालिकेसाठी भाजप अन् शिंदेसेनेचे ठरलं, अजित पवारांना नो एन्ट्री, महायुतीत धुसफूस?

सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदीच्या दरात २.९० रूपयांची वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आपल्याला २००.९० रूपये मोजावे लागतील. तर, १ किलो चांदीच्या दरात २,९०० रूपये मोजावे लागतील. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला २,००,९०० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com