महापालिकेसाठी भाजप अन् शिंदेसेनेचे ठरलं, अजित पवारांना नो एन्ट्री, महायुतीत धुसफूस?

BJP and Shinde Group to Contest Municipal Elections Together: भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी युतीची अधिकृत घोषणा केलीये.

महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वत पक्षांकडून जय्यत तयारी सुरूये. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महायुती निवडणुका एकत्र लढवणार की स्वबळावर, याबाबत चर्चा सुरू असताना, आता या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदे गटानं युतीची अधिकृत घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, या युतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. भाजपच्या काही प्रभावी नेत्यांनी अजित पवारांच्या गटाला सोबत न घेण्याचा आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीतील या नव्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com