Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त, वाचा २२, २४ कॅरेटचे आजचे दर

Gold rate today in India January 3 2026 : आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे दर, शहरनिहाय भाव आणि गुंतवणूक सल्ला वाचा.
Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv
Published On

Gold Rate Today In India : २०२६ वर्षाची सुरूवात सोन्याच्या दरवाढीने झाली होती. १ जानेवारी आणि २ जानेवारी रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली होती. पण आता ३ जानेवारी रोजी सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. शनिवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमती घसरल्या. (Today 22 carat and 24 carat gold price)

आज सोन्याची किंमत किती ?

आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ₹१३५,९७० इतकी झाली आहे. शुक्रवारी ही किंमत १३६,३५० रूपये इतकी होती. ३८० रूपयांनी सोन्याच्याकिंमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. २२ कॅरोटच्या सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १२५,००० रूपयांहून १२४,६५० रुपये इतकी झाली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीतही घसरण नोंदवण्यात आली. आज, सराफा बाजार उघडताच १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ₹१०२,०२० इतकी झाली आहे.

Today Gold Rate
Sleep Tips : झोपा झटपट पटापट! वेळेवर झोपण्याचे ४ असे फायदे की आजार आसपासही फिरकणार नाहीत

भारतामधील कोणत्या शहरात सोन्याची किंमत किती होती?

तज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीमध्ये चांदीची नवीन खरेदी टाळावे. कारण कधीही नफा कमी होऊ शकतो. दुसरीकडे, सोने अजूनही एक संतुलित आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जाते. बाजारातील अनिश्चितता वाढत असताना सोन्याची मागणी मजबूत राहू शकते. भविष्यात सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते. देशात कोणत्या शहरात सोन्याचे दर काय आहेत, ते पाहूयात..

Today Gold Rate
Municipal Election : आई लोकांच्या घरी धुणी भांडी करतेय, तर वडील चौकीदारी, भाजपनं पोराला दिली उमेदवारी

पुणे, नाशिक, जळगावसह मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३५,८२० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेटचा दर प्रति तोळा १२४,५०० रुपये आहे.

लखनौमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३५,९७० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १२४,६५० रुपये आहे.

राजस्थानमधील जयपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १३५,९७० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १२४,६५० रुपये आहे.

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३५,९७० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १२४,६५० रुपये आहे.

कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१३५,८२० आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१२४,५०० आहे.

Today Gold Rate
Atharva Sudame : रीलमध्ये महिला प्रवाशांचा अवमान, पुण्याचा रिलस्टार अथर्व सुदामे अडचणीत, PMPL नं पाठवली नोटीस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com