

benefits of sleeping on time for health : निरोगी आयुष्यासाठी चांगला आहार जसा गरजेचा आहे, तसेच पुरेशी झोपही महत्त्वाची आहे. अनेकदा पुरेशी झोप न मिळाल्यामुळे थकवा येतो. त्याचा परिणाम शरीर आणि मनावर होतो. धकधकीच्या आयुष्यात अनेकांची झोप पूर्ण होत नाही. कामाची वेळ, घरातील टेन्शन, मोबाईलवर सर्चिंग यामुळे पुरेशी झोप होत नाही. जगभरात लाखो लोकांना अपुऱ्या झोपेमुळे क्रॉनिक स्लीप डिसॉर्डर आजार झाल्याचे समोर आलेय.
अपुऱ्या आणि अनियमित झोपेमुळे मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. निरोगी आयुष्यासाठी आहार जितका महत्त्वाच आहे, तितकीच झोपही महत्त्वाची आहे. तज्ज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्तीची दररोज किमान ७ ते ८ तास झोप महत्त्वाचं आहे. त्यामुळे रात्री वेळेवर झोपणं तितकेच महत्त्वाचे आहे. झोप पूर्ण झाल्यास काय फायदा होते, निरोगी आयुष्यासाठी झोप का महत्त्वाची आहे, त्याबाबत जाणून घेऊयात..
आपलं शरीर, मन अथवा बुद्धीला आरामाची गरज असते. त्यामुळेच आपल्या शरीरात एक नैसर्गिक अंतर्गत घड्याळ असते. वैज्ञानिक भाषेत त्याला सर्केडियन रिदम (Circadian Rhythm) म्हणतात. हे घड्याळ आपल्या झोप आणि जागरणाच्या चक्राचे, हॉर्मोन्सच्या निर्मितीचे, पचनक्रियेचे आणि शरीराचे तापमान नियंत्रित करते. त्यामुळे पुरेशी झोप झाल्यास आपल्याला फ्रेश वाटायला लागते.
दररोज नियमित आणि वेळेवर पुरेशी झोप घेतल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे तुमचं शरीर संसर्ग आणि इतर आजारांशी लढण्यास मदत करते.
शरीराला जितकी गरज आहे, तितकी झोप घेतल्यास हृदय निरोगी राहता. पण झोपेची कमतरता असल्यास हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर वाढतो. त्यामुळे हार्टअटॅक येण्याचा धोका वाढू शकतो. वेळेवर झोप घेतल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हॉर्ट अटॅकचा धोका कमी होतो.
दररोज झोप पूर्ण होत असेल तर ब्लड शूगर (उच्च रक्तदाब) कंट्रोलमध्ये राहतो. मधुमेहचा धोकाही कमी होतो. नियमित आणि पुरेशी झोप घेतल्याने सकाळी फ्रेश वाटते, दुपारी थकवा जाणवत नाही. त्याशिवाय दिवसभर शरीराच्या ऊर्जेची पातळी स्थिर राहते.
७ ते ८ तास झोप घेतल्यास तणाव कमी होतोच. त्याशिवाय तुमचे मन शांत राहते. झोप ही नैसर्गिक तणाव कमी करत असल्याचे अनेक रिसर्चमधून स्पष्ट झालेय. वेळेवर झोप घेतल्याने मन शांत राहते, चिडचिड कमी होते आणि तणाव अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येतो.
चांगली झोप घेण्यासाठी नियमित वेळेत झोपणे गरजेचं आहे. त्यासाठी स्क्रीन टाळणे आणि शांत वातावरण महत्त्वाचे आहे. झोपेची काळजी घ्या, कारण निरोगी झोप म्हणजे निरोगी आयुष्य होय. पुरेपूर झोप घेतल्याने अनेक आजारांवर मात करता येते. त्यामुळेच आजपासूनच वेळेवर झोपा अन् आजार टाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.