wife catches husband with girlfriend in Nainital : बायकोला धोका दिला अन् गर्लफ्रेंडसोबत फिरायला बाहेर गेला. सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाच्या स्वागतासाठी गर्लफ्रेंडसोबत नैनीतालमध्ये गेला. पण हुशार बायकोने त्याला शोधून काढला. चार दिवस शोध घेतल्यानंतर बायकोने नैनीतालमध्ये नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडले. त्यानंतर रस्त्यावरच सगळा तमाशा झाला. बायकोने कारच्या काचा फोडल्या अन् नवऱ्याला अद्दल घडवली. अखेर पोलिसांनी दोघांची समजूत काढून वाद थांबवला.
उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रस्त्यावर पती-पत्नी अन् ती असा खळबळजनक प्रकार घडला. गर्लफ्रेंडसोबत विवाहित करूण फिरायला गेला होता. पण तो रंगेहात पकडला गेला. संतापलेल्या पत्नीने गाडी थांबवली, काच फोडल्या आणि नवऱ्याची चांगलीच धुलाई केली. ही घटना बुधवारी येथील डांट चौकात घडली.
गाझियाबादचा विवाहित करूण गर्लफ्रेंडसोबत नैनीतालमध्ये नववर्षाच्या निमित्ताने फिरायला आला होता. दोघे गाडीतून मस्ती करत शहरभर भटकत होते. पण त्याच्या पत्नीला याची कुणकुण लागली. तिने कुटुंबीयांना घेऊन थेट नैनीताल गाठले आणि नवऱ्याचा माग काढला. चौकात गाडी दिसताच पत्नीने ओरडा करून ती थांबवली. नवऱ्याला गाडीबाहेर काढले आणि दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले.
संतापाच्या भरात पत्नीने कारच्या काचा फोडल्या. नातेवाईकांनीही चौकातच जावयाला मारहाण केली. हा सगळा प्रकार पाहून चौकात एकच गर्दी जमली. इकडे हा गोंधळ सुरू होता, त्याचवेळी संधीचा फायदा घेऊन कारमध्येच लपलेल्या गर्लफ्रेंडने मात्र पळ काढला. तिचा ठावठिकाणा अद्याप कुणालाच लागलेला नाही. तिने त्या विवाहित तरुणाचा पुन्हा फोनही उचलला नाही.
नैनीतालच्या चौकात राडा झाला, प्रचंड वाहतूक कोंडी झाली.. हे ऐकताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आधी वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर नवरा-बायको अन् कुटुंबाला समजावून सांगितले. पती-पत्नीला पोलिस स्टेशनमध्ये नेहण्यात आले. तिथे दोघांनी एकमेंकावर गंभीर आरोप केले. पोलिसांनी नवरा-बायकोची समजूत काढून वाद मिटवला. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नैनीतालमध्ये या घटनेची चर्चा सुरू झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.