Atharva Sudame : रीलमध्ये महिला प्रवाशांचा अवमान, पुण्याचा रिलस्टार अथर्व सुदामे अडचणीत, PMPL नं पाठवली नोटीस

PMPML notice to reel star Atharva Sudame : पुण्यातील रिलस्टार अथर्व सुदामे याने पूर्वपरवानगी न घेता पीएमपी बसमध्ये रील शूट करून सोशल मिडियावर प्रसारित केल्याप्रकरणी पीएमपीएमएलकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
Atharva Sudame
Atharva SudameSaam TV Marathi
Published On

Reel Star Atharva Sudame : पुण्यातील रिलस्टार अथर्व सुदामे याच्या अडचणी वाढल्या आहेत.  पूर्व परवानगी न घेता पीएमपीच्या बसमध्ये रिल काढून प्रसारित केल्याप्रकरणी त्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. महामंडळाचा गणवेश, ई-मशीन आणि बॅच बिल्ला यांचा बेकायदेशीर वापर केल्याचा प्रशासनाकडून आरोप केला आहे. सात दिवसाच्या पीएमपी मुख्यालयात हजर राहून खुलासा द्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाई होणार असा इशारा देण्यात आला आहे.

नोटीस मध्ये काय म्हटलं आहे?

आपण पुणे महानगर परिवहन महमहामंडळाच्या मालकीच्या बसमध्ये चित्रीकरण, महामंडळाचा गणवेश, ई मशिन व बॅच बिल्ला याचा बेकायदेशीर वापर करून परिवहन महामंडळाचे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड व प्रसारित केल्याचे निदर्शनास आले आहे.

Atharva Sudame
Viral : गर्लफ्रेंडसोबत नव्या वर्षाच्या पार्टीत दंग, बायकोनं रंगेहात पकडले, कारची काच फोडली अन्

सदर रीलमध्ये महिला प्रवाशांचा अवमान व अपमानास्पद चित्रण करण्यात आले आहे. या कृत्यामुळे महिला प्रवाशांच्या सन्मान, प्रतिष्ठा, मानसिक सुरक्षितता तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या महिलांच्या हक्कांना बाधा पोहोचत आहे. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाची जनमानसात प्रतिमा मलिन होत असून पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अंतर्गत नियम, धोरणाच्या विरोधात आहे. परिवहन महामंडळाची प्रतिमा, व्यावसायिक हित व सार्वजनिक बस सेवे वरील विश्वासावर विपरित परिणाम होत आहे.

Atharva Sudame
कार्यकर्त्यांनो, आता तरी जिरली का?

आपणास या नोटीसद्वारे कळविण्यात येत आहे की सदर आक्षेपार्ह रील तत्काळ इन्स्टाग्राम वरुन काढून टाकावे. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेतल्याशिवाय भविष्यात महामंडळाच्या बससेवेबाबत कोणतेही फोटो / व्हिडिओ / रील / मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये.

Atharva Sudame
Municipal Election : निवडणूक निकालाआधीच भाजपनं खातं उघडलं, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रेखा चौधरींची बिनविरोध निवड

आपणास सदरील नोटीस प्राप्त दिनांकापासून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा पुणे महानगर परिवहन महामंडळ, मुख्य कार्यालय, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे ४११०३७ येथे सादर करावा. सदरील खुलासा विहित मुदतीत परिवहन महामंडळास सादर न केल्यास तसेच सदर इन्स्टाग्राम वरील रील हटविण्यात कसूर केल्यास, आपल्याविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Atharva Sudame
भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक! संभाजीनगरमध्ये माजी मंत्र्यांची कार रोखली, काळे फासले, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com