Manasvi Choudhary
चांदीच्या अंगठ्या घालण्याची स्टाईल ट्रेडिंगमध्ये आहे. चांदीची ज्वेलरी केवळ एक दागिना म्हणून नाही तर पर्सनॅलिटी स्टेटमेंट म्हणून देखील घालतात.
पुरूष व महिलां दोघांसाठीही सिल्वर रिंग्सच्या काही डिझाईन्स आहेत त्या आज आपण पाहूया.
एकाच बोटात दोन-तीन अतिशय नाजूक आणि बारीक चांदीच्या अंगठ्या घालण्याचा ट्रेंड सध्या आहे. हे डिझाईन जिन्स-टॉप आणि ऑफिस वेअरवर अतिशय क्लासी दिसते.
ज्यांना थोडा 'विंटेज' किंवा 'आर्टिस्टिक' लूक आवडतो त्यांच्यासाठी ऑक्सिडाइज्ड रिंग्स ट्रेडिंगमध्ये आहेत त्यावर फुलांची किंवा कोयरीची नक्षी असते.
चांदीच्या अंगठीमध्ये एखादा नैसर्गिक खडा लावलेले डिझाईन सध्या खूप लोकप्रिय आहे. हे डिझाईन इंडो-वेस्टर्न तसेच एथनिक स्टाईलवर कॅरी करू शकता.
सिल्व्हरमध्ये सध्या 'किंग-क्वीन' किंवा 'मॅचिंग डिझाईन' असलेल्या कपल रिंग्सना मोठी मागणी आहे. विशेषतः व्हॅलेंटाईन डे किंवा नवीन वर्षाच्या गिफ्टसाठी हे उत्तम पर्याय आहेत.
या अंगठ्या मागून खुल्या असतात, ज्यामुळे त्या कोणत्याही बोटात व्यवस्थित बसतात. यावर दोन टोकांना छोटे मणी किंवा हार्ट शेप असतात.
पुरुषांमध्ये सध्या 'सिग्नेट रिंग्स आणि 'थंब रिंग्स'ची क्रेझ आहे. साध्या प्लेन सिल्व्हर बॅण्डला पुरुषांची पहिली पसंती मिळत आहे.