Gold Rate Today Saam tv
बिझनेस

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, इतकं झालं स्वस्त, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Gold price today India 24K 22K 18K per gram latest update : रूपयाची घसरण आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. मुंबई, पुणे, दिल्ली आणि चेन्नईतील ताजे सोन्याचे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Gold Price Today; check todays 18k 22k and 24k Gold Rates Mumbai Pune : मागील पाच ते सहा दिवसांपासून भारतीय चलन अर्थात रूपयाची किंमत घसरत आहे. दुसरी डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी सराफा बाजारात सोन्याच्या किंमती घट झाली आहे. गुरूवारी, सकाळी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. त्याशिवाय मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही सोन्याच्या दरात कपात झाल्याचे दिसून आले. (City-wise gold rate Mumbai Pune Delhi Chennai comparison)

देशातील आजचा सोन्याचा दर Gold Price In India Today

देशांतर्गत बाजारात सोन्याचे दरात आज किरकोळ घसरण दिसून आली. सराफा बाजार उघडताच प्रति ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर 13,036 रूपये इतका झालाय. बुधवारी याची किंमत 13,058 रुपये इतकी होती. म्हणजेच, सोनं प्रति ग्रॅम २२ रूपयांनी स्वस्त झालेय. २२ कॅरेटचे सोनं प्रति ग्रॅम २० रूपयांनी स्वस्त झालेय. आज 11,950 प्रति ग्रॅम इतकी किंमत आहे. तर १८ कॅरेटच्या सोन्याचे दर प्रति ग्रॅम  9,778 रूपये झालेय. यामध्ये १६ रूपयांनी घसरण झाली.

प्रति तोळा सोनं किती रूपयांनी घसरले?

24 कॅरेटचे सोनं प्रति तोळा २२० रूपयांनी स्वस्त झालेय. आज सराफा बाजार सुरू होताच प्रति तोळा सोन्याची किंमत 1,30,360 इतकी झाली. २२ कॅरेट सोन्याची किंमत २०० तर १८ कॅरेट सोन्याची किंमत १६० रूपयांनी कमी झाली आहे. आज २२ कॅरेट सोनं प्रति तोळा 1,19,500 रूपये तर १८ कॅरेट सोनं प्रति तोळा  97,780 रूपयांना मिळतेय.

कोणत्या शहरात सोन्याचे दर किती?

राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १३,०५१ रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम अनुक्रमे ११,९६५ रुपये आणि ९,७९३ रुपये इतका आहे. मुंबई, कोलकाता, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, जळगाव आणि केरळमध्ये किंमती समान आहेत. या ठिकाणी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १३,०३६ रुपये इतकी आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ११,९५० रुपये आहे. दरम्यान, चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १३,११३ रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२,०२० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १०,०२५ रुपये असा आहे.

देशात चांदीचे दर काय ? स्वस्त झाले की महाग? (Silver Price In India)

देशातील चांदीच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. आज सराफा बाजारात बुधवरच्या तुलनेत चांदीचे दर जैसे थे राहिले. सराफा बाजारात चांदीचे दर १,९१,००० प्रति किलो इतके आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNC Candidates List: मोठी बातमी! अखेर मनसेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ३३ शिलेदारांना संधी; कुणा-कुणाचे नाव?

Maharashtra Live News Update : मुंबईत भाजपला १३७ तर शिवसेनेला ९० जागा

Today Temprature : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! जानेवारीमध्ये कडाक्याच्या थंडीचा अंदाज, वाचा आजचे हवामान कसे असेल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! नवीन वर्षात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी काय बदलणार?

Accident : धाराशिवमध्ये भयंकर अपघात, पवनचक्कीच्या वाहनाने २ जणांना चिरडले, संतप्त वाहन दिले पेटवून

SCROLL FOR NEXT