डॉलरची नाईन्टी, रुपयाच्या गटांगळ्या; EMI, मुलांचं शिक्षण ते दैनंदिन खर्च; किती भयंकर असेल परिस्थिती, वाचा

Why rupee fell to 90 against dollar explained : डॉलरने पहिल्यांदा ९०चा टप्पा ओलांडताच भारतीय रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. रूपया कमजोर झाल्याने ईएमआय, शिक्षण, इंधन, दैनंदिन खर्च आणि आयातीत वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वाढली आहे.
Dollar Vs Rupee
Dollar Vs Rupee
Published On

Dollar Vs Rupee : भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहचलाय. डॉलरने पहिल्यांदाच ९०चा टप्पा ओलांडला, पण दुसरीकडे रूपयाच्या गटांगळ्या काही थांबत नाहीत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची आजवरची सर्वात वाईट अवस्था झाली आहे. भविष्यात रूपयाची ही घसरण सुरूच राहू शकते, अशी भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रूपयाच्या या अवमुल्यनामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की रुपयाच्या घसरणीचा तुमच्यावर काय परिणाम होईल?

रूपयाच्या घसरणीचा आपल्या खिशावर अन् दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे. EMI, मुलांचं शिक्षण महागणार आहेच. त्याशिवाय दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किंमती वाढू शकतात. यावर मात करण्यासाठी आरबीआयकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. पण ते प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसतेय. त्यामुळे रूपयाच्या या घसरणीमुळे अर्थव्यवस्थेला नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.डॉलरची किंमत वाढल्यानंतर आपल्यावर नेमका काय परिणाम होईल, याबाबत जाणून थोडक्यात जाणून घेऊयात.. त्याआधी रूपया इतका नेमका का घसरला? हे जाणून घेऊयात..

Dollar Vs Rupee
Municipal Corporation Election Date : महापालिका निवडणुकीची संभाव्य तारीख समोर, वाचा कधी उडणार धुरळा

रूपयाच्या घसरणीचा खिशावर परिणाम -

रूपयाची किंमत घसरल्याचा परिणाम शेअर मार्केटपासून ते व्यापाऱ्यांवर होतो. रूपया कमकुवत झाल्यामुळे आपल्याला इंधन बिलांपासून ते ईएमआय, ट्यूशन फी आणि प्रवास खर्चापर्यंत फटका बसेल. भारत तेल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खते आणि खाद्य तेलाची आपण ९० टक्के आयात करतो. त्यामुळे रूपया कमकुवत झाला आपल्या खिशावर थेट परिणाम होतोच. आयफोन, फ्रिज, कार, या गोष्टी महाग होणारच. त्याशिवाय विदेशात शिक्षण घेणेही महागाले. २०२३ च्या तुलनेत ५ ते १० लाखांचा खर्च वाढू शकतो.

Dollar Vs Rupee
दहावीत ९७ टक्के, वर्गात पहिला; टॉपरने ट्रेनसमोर उडी घेत जीव दिला, मृतदेह पाहून आई बेशुद्ध पडली

रूपया घसरणीची ३ कारणे -

अमेरिकेने आपल्यावर काही व्यापार क्षेत्रात ५० टक्क्यांचा टॅरिफ लावलाय. त्यांच्यासोबत व्यापाराच्या वाटाघाटी करण्यात आपल्याला अपयश आले. याचा व्यवसायावर मोठा परिणाम झालाय.

देशाचा जीडीपीमध्ये वाढ झाली अन् महागाई स्थिर असतानाही विदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या शेअर बाजारातून काढता पाय घेतला. त्यांनी १७ अब्ज डॉलर्स काढून घेतले, त्याचा परिणाम रूपयाच्या किंमतीवर झाला.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताची अर्थव्यवस्था स्थिरवरून मंदावणारी असल्याचे म्हटले. पण आरबीआयकडून आता रूपया मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, पण त्यांच्या धोरणाला अद्याप यश आलेले नाही. आरबीआयमधील धोरणात्मक बदलाचाही रूपयावर परिणाम झालाय.

Dollar Vs Rupee
दहावीत ९७ टक्के, वर्गात पहिला; टॉपरने ट्रेनसमोर उडी घेत जीव दिला, मृतदेह पाहून आई बेशुद्ध पडली

रूपया घसरल्यावर काय काय महागणार, आपल्यावर परिणाम काय? -

गेल्या काही दिवसांपासून रूपयाची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली आहे. आज ऐतिहासिक निचांकी पातळीवर पोहचलाय. याचा परिणाम फक्त बँकेवरच नाही तर आपल्या खिशावर अन् दररोजच्या वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंमतीवर होणार आहे. आपण ९० टक्के पेट्रोल-डिझेल आणि ६० टक्के खाद्यतेल आयात करतो. रूपया कमकुवत झाला की किमतीमध्ये वाढ होणार. पेट्रोल-डिझेल अन् स्वयंपाक घरातील तेल, सिलिडेर महागले की सर्वसामान्य, गरीब कुटुंबियांचं बजेट ढासळेल.

मोबाईल, लॅपटॉप, फ्रीज यांसारख्या वस्तू आणखी महाग होतील. विद्यार्थ्यांची शाळेची फी वाढणार. विदेशात कामावर गेलेल्या नोकरदारांवरही याचा परिणाम होणार आहे. महिन्याभराचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. प्रत्येक गोष्ट महाग होऊ शकते. थोडक्यात काय तर रूपया घसरला की आपल्या ताटातील अन्नही महाग होईल.

Dollar Vs Rupee
भारताशेजारच्या ३ देशात अस्मानी संकट, १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू, ८०० जण बेपत्ता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com