Kanpur student suicide case : दहावीमध्ये ९७ टक्के मार्क्स घेऊन रौनक पाठक वर्गात पहिला आला. पण त्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. सायकल घेऊन तो घराबाहेर गेला अन् काही वेळातच ही घटना घडली. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबियांना धक्का बसला. मुलाचा मृतदेह पाहून आई ढसाढसा रडली. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही घटना घडली.
रौनक पाठक याने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, शैक्षणिक दबावामुळे रौनक पाठक याने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांकडून मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्याच्या वर्गातील मित्रांकडेही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी रौनक याचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप तपासण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील जुही यार्डजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली. रौनक पाठक हा ब्रिज किशोरी देवी मेमोरियल स्कूलमध्ये शिकला होता. तो शाळत आणि शहरातील टॉपर होता. दहावीला त्याला ९७ टक्के गुण मिळवले होते. रौनक शांत स्वभावाचा होता आणि तो नेहमीच अभ्यासात व्यस्त असायचा. यश मिळवण्यासाठी तो दिवसरात्र अभ्यासच करायचा, असे शेजारच्यांनी सांगितले.
रौनक याची रविवारी प्री-बोर्ड परीक्षा होती. पेपर चांगला गेला होता. सोमवारी तो सकाळी घरातून निघाला. सायकलवरून घराबाहेर पडल्यानंतर त्याने काही क्षणातच आयुष्याचा दोर कापला. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांच्या पायाखालील वाळू सरकली. रौनक गेल्याचा कुटुंबाला विश्वासच बसत नव्हता. आई ललिता मुलाचा मृतदेह पाहून बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यानंतर "रौनकने आत्महत्या कशी केली? आता त्याच्याशिवाय आपले काय होईल?" हेच शब्द ती बोलत होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.