Pune : पुण्याहून थेट नाशिकपर्यंत ट्रेनचा प्रवास, कसा असेल मार्ग, कोणत्या शहराला होणार फायदा?

Pune Nashik Train Rout Detail News : सुधारित पुणे–नाशिक हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. नवीन मार्ग, डबलिंग काम, डीपीआर, पर्यटन, उद्योग आणि कनेक्टिव्हिटी वाढीस कसा फायदा होणार? संपूर्ण माहिती येथे वाचा.
Nashik Pune Trains
Pune Nashikx
Published On

Pune Nashik Railway Project Latest News : पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये रेल्वे प्रवास लवकरच सोपा आणि जलद होणार आहे. केंद्र सरकारने या मार्गासाठी भव्य मास्टर प्लानला मंजुरी दिली आहे. नवीन हाय-स्पीड आणि सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पामुळे (Pune–Nashik High-Speed Rail Project) अंतर केवळ २ ते अडीच तासांत पार होईल. सध्या रोडने ५-६ तास लागणारा प्रवास आता आरामदायी आणि वेळेची बचत करणारा होईल. पुणे-नाशिक महामार्गावरील प्रचंड वाहतूककोंडीतून सुटका मिळेल. प्रवासी, व्यावसायिकांना आणि पर्यटकांना या मार्गाचा मोठा फायदा मिळणार आहे. हा रेल्वे प्रकल्प केवळ वेळ वाचवणार नाही, तर दोन्ही शहरांमधील आर्थिक व सामाजिक जोडणी अधिक बळकट करेल. अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत माहिती दिली. जाणून घेऊयात हा प्रोजेक्ट नेमका आहे तरी काय?

लोकसभेत नाशिक–पुणे हाय-स्पीड प्रकल्पासंदर्भात करण्यात आलेल्या सूचनांवर वैष्णव यांनी उत्तर दिले. महाराष्ट्र सरकार, स्थानिक प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ञ यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर रेल्वे विभागाने जीएमआरटी क्षेत्र टाळणारी पर्यायी मार्गरचना प्रस्तावित केली आहे. या मार्गामुळे या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक केंद्राचे संरक्षण सुनिश्चित झाले. त्याशिवाय या भागातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकासालाही चालना मिळते.

Nashik Pune Trains
दहावीत ९७ टक्के, वर्गात पहिला; टॉपरने ट्रेनसमोर उडी घेत जीव दिला, मृतदेह पाहून आई बेशुद्ध पडली

कसा असेल नवीन रेल्वे मार्ग -

नाशिक → साईनगर शिर्डी → पुणतांबा → निंबलक → अहिल्यानगर → पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे)

नाशिक-पुणे मार्गाचे काम किती झाले?

नाशिक रोड ते साईनगर शिर्डी दरम्यानच्या दुहेरी मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ची तयारी पूर्ण झाली आहे.

साईनगर शिर्डी–पुणतांबा (१७ किमी) दुहेरीकरणासाठी रु २४० कोटींची मंजुरी आधीच देण्यात आली आहे.

पुणतांबा–निंबलक (८० किमी) या मार्गाचे दुहेरीकरणाचे आधीच पूर्ण झाले आहे.

निंबलक –अहिल्यानगर (६ किमी) या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

अहिल्यानगर–पुणे (१३३ किमी) दरम्यान चाकण इंडस्ट्रियल इस्टेटला जोडणाऱ्या नवीन दुहेरी मार्गासाठी रु८,९७० कोटींचा डीपीआर देखील तयार करण्यात आला आहे.

Nashik Pune Trains
Municipal Corporation Election Date : महापालिका निवडणुकीची संभाव्य तारीख समोर, वाचा कधी उडणार धुरळा

पुणे-नाशिक रेल्वे मार्ग झाल्यास फायदा काय?

तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल. नवीन मार्गरचना नाशिक, एक वारसा आणि धार्मिक शहर, देशातील सर्वात प्रमुख तीर्थस्थळांपैकी एक असलेल्या साईनगर शिर्डीशी आणि पेशवे राजवटीत मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक शहर पुणेशी जोडला जाईल. शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि पंढरपूर मार्गावरील धार्मिक पर्यटन जोडली जातील. पुण्यातील किल्ले व ऐतिहासिक वारसा स्थळांशी निगडित ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल. मार्गिकेजवळील ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक हस्तकला उद्योगांना चालना मिळेल. पर्यटक, भक्त आणि प्रवासी यांना या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांदरम्यान अधिक सुरळीत, जलद आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येईल. त्याशिवाय चाकणमध्ये असणाऱ्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. पुणे-नाशिक या कॉरिडॉरमुळे या पट्ट्यात येणाऱ्या विविध उद्योगांना, विशेषतः चाकण औद्योगिक वसाहत, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी उद्योगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या उत्पादन केंद्राला लक्षणीय फायदा होईल.

Nashik Pune Trains
डॉलरची नाईन्टी, रुपयाच्या गटांगळ्या; EMI, मुलांचं शिक्षण ते दैनंदिन खर्च; किती भयंकर असेल परिस्थिती, वाचा

कनेक्टिव्हिटीमुळे काय होणार ?

विद्यार्थ्यांच्या गतिशीलतेत वाढ होईल.

शैक्षणिक आणि कौशल्य-विकास सहकार्य अधिक बळकट होईल

ज्ञानाधारित आणि तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांच्या वाढीस चालना मिळेल

संपूर्ण कॉरिडॉरमध्ये संतुलित शहरी विकासाला चालना मिळेल

पुणे–नाशिक मार्ग ही महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दोन प्रमुख महानगर क्षेत्रांना जोडून, चाकण तसेच इतर औद्योगिक पट्ट्यांनाही याचा फायदा होणार आहे. या रेल्वे मार्गामुळे पर्यटन व शैक्षणिक गतिशीलता अधिक बळकट होईल.

Nashik Pune Trains
स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com