Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT, IIM मधून शिक्षण, रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडली, वडिलांच्या इच्छेसाठी दिली UPSC; आयपीएस रश्मिता राव यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IPS Rashmita Rao: रश्मिता राव यांनी IIT आणि IIM मधून शिक्षण केले. त्यानंतर वडिलांच्या इच्छेसाठी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. रश्मिता राव यांनी खूप कमी वयात चांगली कामगिरी केली आहे.

Siddhi Hande

स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. चांगल्या मोठ्या पदावर काम करुन देशात चांगले बदल घडवून आणण्यासाठी अधिकारी व्हायचे असते. आयएएस, आयपीएस अशा पदांवर काम करणारे अधिकारी देशात काहीतरी बदल घडवून आणतात. असाच काहीसा बदल आयपीएस रश्मिता राव यांनी केला आहे.

रश्मिता राव यांचा प्रवास तर प्रेरणादायी आहे त्याचसोबत त्यांची कामगिरीही सर्वांना प्रेरणा देते. रश्मिता यांनी २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्णदेखील झाल्या. त्यांना ५३४ रँक मिळाली. त्यानंतर त्या आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत झाल्या. त्यांना सुरुवातीला महाराष्ट्र कॅडर मिळाले होते.

आयपीएस रश्मिता या मूळच्या तेलंगणाच्या रहिवासी. त्या पहिल्यापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी आपल्या गावातूनच शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, आपल्या मुलीने सिविल सर्व्हिसमध्ये जावे. रश्मिता यांच्या शाळेत एकदा आयएएस अधिकारी आले होते. त्यांनीच त्यांना प्रेरणा दिली.

रश्मिता यांनी इंजिनियर व्हायचे होते. परंतु वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सिविल सर्विसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी IIT JEE परीक्षा क्रॅक केली. यानंतर रश्मिताने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी IIT कानपूरमध्ये अॅडमिशन घेतले. त्यानंतर इंजिनियरिंग झाल्यावर त्यांनी IIM कोझिकोड येथे अॅडमिशन घेतले.

IIM मधून डिग्री प्राप्त केल्यानंतर त्यांना रिझर्व्ह बँकेत नोकरी मिळाली. नोकरी करता करता त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. काही दिवसांनी रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्या परीक्षेची तयारी करताना बिल्कुल पण सोशल मीडियाचा वापर करायच्या नाहीत. त्यांनी २०२९ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. त्यांचे आयपीएस म्हणून सिलेक्शन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

SCROLL FOR NEXT