EPFO News Saam Tv
बिझनेस

EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार

EPFO PF Withdrawal Through UPI: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पीएफचे पैसे तुम्ही यूपीआय किंवा एटीएमद्वारे काढता येणार आहे. त्यामुळे पीएफ विड्रॉलची प्रक्रिया खूप सोपी होणार आहे.

Siddhi Hande

EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी

आता PF चे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार

एप्रिलपासून सुरु होणार सुविधा

प्रत्येक कर्मचाऱ्याचे ईपीएफओ अकाउंट हे असते. ईपीएफओ अकाउंटमध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातील एक ठरावीक रक्कम दर महिन्याला जमा केली जाते. हेच पैसे पीएफ आणि पेन्शन अकाउंटमध्ये जमा केले जातात. दरम्यान, कर्मचाऱ्यांना कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत पीएफ काढण्याची परवानगी असते. आता हे पीएफचे पैसे काढणे अजून सोपे झाले आहे. तुम्ही यूपीआयद्वारे थेट पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करु शकतात.

एप्रिलपासून सुरु होणार सुविधा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी येत्या एप्रिल महिन्यापासून खातेधारकांना ही सुविधा देणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना यूपीआयद्वारे पैसे काढता येणार आहे. यूपीआयद्वारे थेट पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला पीएफ अकाउंटमध्ये एक ठरावीक रक्कम शिल्लक ठेवावी लागणार आहे. उर्वरित रक्कम तुम्हाला यूपीआयद्वारे काढता येणार आहे.

ATM आणि UPI द्वारे पैसे काढता येणार (EPFO PF Withdrawal Through UPI And UPI)

EPFO खातेधारकांना पीएफ खात्यातून यूपीआयद्वारे पैसे काढता येणार आहे. यासाठी त्यांना यूपीआय पिनचा वापर करावा लागणार आहे. पैसे बँक खात्यात जमा झाल्यानंतर तुम्ही इलेक्ट्रॉनिक पेमेंट, एटीएम आणि डेबिट कार्डद्वारे पैसे काढू शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागच्या वर्षी मे महिन्यातच ईपीएफओ ही सुविधा सुरु करणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा लांबणीवर गेली होती. मात्र, आता लवकरच ही सुविधा सुरु केली जाईल.

सध्या ईपीएफओमधून पैसे काढण्याची प्रोसेस खूप लांबलचक आहे. पैसे काढण्यासाठी अर्ज करावा लागतो. यानंतर अप्रुव्हल झाल्यानंतर दोन तीन दिवसात पैसे खात्यात जमा होतात. आता ही क्लेमची प्रोसेस अजून सोपी केली जाणार आहे. ईपीएफओ खातेधारकांना थेट खात्यातून पैसे काढण्यास मंजुरी दिली जाणार आहे. सध्या त्यांच्या खात्यात थेट पैसे काढण्यासाठी मंजुरी दिली नाहीये. त्यांच्याकडे बँकिंगचा परवाना नाहीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ त्यांच्या सेवा बँकांप्रमाणेच सुधारण्याचा प्रयत्न करते.

ईपीएफओ खात्यातील जमा रक्कमेपैकी एकूण ७५ टक्के रक्कम काढता येणार आहे. २५ टक्के रक्कम तुम्हाला खात्यात ठेवावी लागणार आहे. यासाठी ८.२५ टक्के चक्रव्याढ व्याज मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समरजीत घाटगे यांनी फेसबुक पेजवरून हटवली तुतारी, लवकरच शरदचंद्र पवार गटाला राम राम करणार

Protein Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्रोटीन टाळा; या 5 गोष्टींकडे द्या लक्ष, 3 महिन्यात 10 किलो वजन होईल कमी

Homemade Face Pack For Pimple Remove : चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात? मग 'या' फळाचा लावा फेसपॅक, आठवड्याभरात दिसेल फरक

GST अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये आढळलं कोयता अन् मडकं

Paneer Crispy Recipe: घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर क्रिस्पी; सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT