EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFOमध्ये बँक अकाउंट अपडेट कसं करायचं? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

EPFO Bank Account Update: अनेकदा एकाच व्यक्तीचे दोन सॅलरी अकाउंट असतात. कंपनी बदलल्यानंतर अकाउंट बदलतात. हे अकाउंट ईपीएफओमध्ये अपडेट करणे गरजेचे आहे. जर तुम्ही अकाउंट अपडेट केले नाही तर तुम्हाला फटका बसू शकतो.

Siddhi Hande

प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा केले जातात. दरम्यान, अनेकजण दोन सॅलरी अकाउंट ओपन करतात. दरम्यान, अनेक ईपीएफओमध्ये हे अकाउंट अपडेट करायला विसरतात. त्यामुळे ईपीएफ ठेवी ट्रान्सफर करण्यास अडचणी येतात. जर हे खाते निष्क्रिय झाले किंवा बंद झाले तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जाणार नाही.

ईपीएफओ कर्मचाऱ्यांनी ईपीएफमध्ये त्यांचे बँक खाते तपासणे महत्त्वाचे आहे. यासाठी ईपीएफओ सदस्य ई सेवा पोर्टलवर लॉग इन करा. यानंतर तुमच्या यूएएनमध्ये कोणतीही बँक खाती लिंक आहे ते चेक करा. याचसोबत जर तुम्ही बँक अकाउंट बदलले असेल तर तेदेखील अपडेट करु शकतात.

कर्मचाऱ्यांनी त्यांचे आधार अपडेट केले की नाही हेदेखील चेक करु शकतात. याचसोबत आधार, पॅन आणि बँक अकाउंट हे जुळत आहेत की नाही हे चेक करु शकतात. स्पेलिंग चुकांमुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बँक अकाउंटसोबतच इतर माहितीदेखील अपडेट असणे गरजेचे आहे.

बँक अकाउंट अपडेट कसं करायचं? (EPFO Bank Account Update)

तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ईपीएफमध्ये बँक अकाउंट अपडेट करता येणार आहे. तुम्हाला ईपीएफओच्या ई सेवा पोर्टलवर लॉग इन करायचे आहे. यानंतर व्यवस्थापित करा यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला केवायसी ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचे तुमचे बँक अकाउंट डिटेल्स दिसेल. यानंतर तुम्ही हे अकाउंट अपडेट करु शकतात.

तुम्ही बँकेची माहिती अपडेट केल्यानंतर नियोक्त्याकडे मंजुरीसाठी जाते. यानंतर एचआरच्या मंजुरीनंतर पुढे ईपीएफओकडे दिले जाते. यानंतर तुमचे बँक अकाउंट अपडेट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT