EPFO News Saam Tv
बिझनेस

EPFO खातेधारकांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार; PF खात्यात जमा होणार ₹ ५२०००

PF Account: पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएफवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पीएफवरील व्याजदर ८.७५ टक्के पर्यंत वाढवू शकते.

Priya More

Summary:

  • पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे

  • केंद्र सरकार पीएफवरील व्याजदराबाबत मोठा निर्णय घेणार आहेत

  • पीएफवरील व्याजदर ८.७५ टक्के पर्यंत वाढवू शकते

  • जानेवारीपर्यंत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे

पीएफ खातेधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार यावेळी पीएफवरील व्याजदर ८.७५ टक्के पर्यंत वाढवू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी व्याजदरात वाढ होणे अपेक्षित आहे. ज्याचा थेट फायदा तुमच्या ठेवींवरील व्याजावर होईल.

पीएफ खातेधारकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की, त्यांना यावर्षी त्यांच्या ठेवींवर किती व्याज मिळेल. सुत्रांनी आणि मार्केट तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, सरकार यावर्षी व्याजदर ८.७५ टक्के पर्यंत वाढवू शकतो. याचाच अर्थ जर तुमच्या खात्यामध्ये ६ लाख रुपये असतील तर तुम्हाला ५२,००० रुपयांपर्यंत व्याज मिळू शकते. जानेवारीमध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

व्याजदरात वाढ झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम तुमच्या पीएफ अकाऊंटमधील ठेवीवर होईल. जर तुमच्या पीएफ खात्यात ६ लाख रुपये असतील तर तुम्हाला ८.७५ टक्के दराने अंदाजे ५० हजार ते ५२ हजार रुपये व्याज मिळू शकते. तर ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात ५ लाख रुपये आहेत त्यांना अंदाजे ४२ हजार रुपये व्याज मिळू शकतो. ही रक्कम थेट तुमच्या निवृत्ती निधीत जमा होईल. यामुळे तुमची बचत वाढत जाईल.

दरम्यान, केंद्र सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ८.२ टक्के व्याजदर दिला होता. जो आधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. आता नवीन आर्थिक वर्षासाठी जास्त दर मिळण्याची अपेक्षा असल्याने कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण जानेवारीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. ८ कोटी पीएफ खातेधारक या निर्णयाची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT