EPFO UAN Merge: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीएफ अकाउंटचे यूएएन आहेत? मग मर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Provident Fund: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त यूएएन असतील तर काळजी करू नका! ईपीएफओच्या सोप्या प्रक्रियेद्वारे जुने यूएएन मर्ज करून एकाच खात्यात निधी एकत्र करा.
PF Interest Rate
PF Interest RateSaam Tv
Published On

कामाला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे त्याचे पीफचे खाते असते. बरेच लोक कालांतराने त्यांच्या सोयीनुसार नोकऱ्या बदलत असतात. यामध्ये प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणारे असोत किंवा कोणत्याही क्षेत्रातले नोकऱ्यांमध्ये हे लोक बदल करतच असतात. त्यामुळे मागच्या पीएफ खात्यातील पैसे काढणं कठीण होतं. अनेकदा एका व्यक्तीचे दोन किंवा अधिक यूएएन क्रमांक तयार होतात.

कर्मचार्‍यांना याच अडचणीवर उपाय म्हणून ईपीएफओ (Employees Provident Fund Organisation) ने यूएएन प्रणाली सुरु केली. हा १२ अंकी क्रमांक प्रत्येक पीएफ खाताधारकाला दिला जातो. त्याद्वारे तो आपल्या सर्व पीएफ खात्यांचं एकाच ठिकाणी व्यवस्थापन करू शकतो. श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून हा यूएएन दिला जातो. नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीकडे फक्त एकच यूएएन असावा, पण नोकरी बदलताना कंपन्या नवीन पीएफ खाते उघडत असल्याने अनेक वेळा नवे यूएएन तयार होतात.

PF Interest Rate
Chanakya Niti: 'या' ३ गोष्टी देतात वाईट काळाची चाहूल, वेळेत ओळखा संकेत! नाही तर...

जर तुमच्याकडे दोन किंवा अधिक यूएएन असतील तर सर्वप्रथम तुमच्या सध्याच्या कर्मचाऱ्याला याची माहिती द्या. त्यानंतर तुमचा सध्याचा आणि जुना यूएएन क्रमांक लिहून uanepf@epfindia.gov.in या ईमेल आयडीवर मेल पाठवा. ईपीएफओ याची पडताळणी करून तुमचा जुना यूएएन ब्लॉक करेल आणि सध्याचा यूएएन सक्रिय ठेवेल. यानंतर ब्लॉक केलेल्या यूएएनशी जोडलेले जुने पीएफ खाते नवीन यूएएनशी जोडण्यासाठी ट्रान्सफर अर्ज करा. यामुळे तुमची सर्व माहिती आणि निधी एकाच खात्यात एकत्र होतील.

एक दुसरा सोपा मार्गही आहे. जर तुम्ही तुमचं जुने पीएफ खाते नवीन खात्यात ट्रान्सफर केलं, तर ईपीएफओ आपोआप दोन्ही यूएएन ओळखतं आणि जुना यूएएन बंद करतं. अशा वेळी जुना यूएएन आपोआप डिएक्टिवेट होतो आणि त्या खात्याशी जोडलेली सदस्य आयडी तुमच्या नवीन यूएएनशी लिंक केली जाते. यामुळे भविष्यात कधीही पीएफ रक्कम काढताना किंवा ट्रान्सफर करताना कोणतीही अडचण येणार नाही.

PF Interest Rate
Cleaning Hacks : पाणी तापवण्याचा हिटर साफ करण्याची ही भन्नाट टेकनिक करा फॉलो; कमी होईल वीजबिल आणि पाणी होईल पटकन गरम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com