
निवृत्तीनंतर स्थिर आणि सुरक्षित उत्पन्नाची हमी मिळवायची असेल, तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
सरकारकडून चालवली जाणारी ही योजना फक्त सुरक्षितच नाही, तर पूर्णपणे करमुक्त परतावा देणारी आहे. या योजनेत शिस्तबद्ध गुंतवणूक करून दरमहा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न मिळवणं शक्य आहे.
भारत सरकारने १९६८ मध्ये सुरू केलेली पीपीएफ योजना आयकर अधिनियम १९६१ च्या कलम ८०C अंतर्गत कर सवलत देते. या योजनेत ५०० रुपयांपासून ते १.५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करता येते. कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत हे खाते उघडता येते. याचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा आहे, परंतु गुंतवणूकदार इच्छित असल्यास ५-५ वर्षांच्या टप्प्यांमध्ये कालावधी वाढवू शकतो.
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मिळणारा परतावा पूर्णपणे करमुक्त असतो. दरवर्षी १.५ लाख रुपये या योजनेत गुंतवल्यास, दीर्घकाळानंतर मोठी मॅच्युरिटी रक्कम मिळते. उदाहरणार्थ, जर तुम्ही सलग ३२ वर्षे प्रत्येक वर्षे १.५ लाख रुपये गुंतवले, तर तुमच्याकडे एकूण १ कोटी ८० लाख ५५ हजार ५३४ रुपये इतकी रक्कम तयार होऊ शकते.
ही मॅच्युरिटी रक्कम जर बँकेत ७.१ टक्के वार्षिक व्याजदराने ठेवली, तर तुम्हाला वर्षभरात सुमारे १५ लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजेच दरमहा १,०६,८२८ रुपये इतके करमुक्त उत्पन्न मिळू शकते. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असल्यामुळे निवृत्तीनंतर नियमित आणि सुरक्षित उत्पन्नासाठी ही योजना एक उत्तम पर्याय आहे.
यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे व्याजाचा अधिक फायदा मिळवण्यासाठी दरवर्षी १ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान ‘एकरकमी’ गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. तसेच, ५ वर्षांनंतर तुम्हाला आर्थिक गरज असल्यास एकदा पैसे काढण्याची मुभा असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.