Sakshi Sunil Jadhav
भारतीय इतिहासातील महान अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि राजकारणी म्हणून आचार्य चाणक्य यांचं नाव आजही आदराने घेतले जाते.
चाणक्य नितीमध्ये जीवनातील अनेक सत्य, अनुभव आणि धोरणांचा उल्लेख आहे. चाणक्य म्हणतात जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या वाईट काळाची पूर्वसूचना देतात. त्या वेळेत जर आपण अलर्ट राहिलो, तर संकट टाळणं शक्य होईल.
चाणक्यांच्या मते, घरात तुळशीचे रोप असणं अत्यंत शुभ असतं. हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जातं. मात्र तुळस अचानक कोमेजली किंवा सुकली, तर तो एक अशुभ संकेत असतो.
जर घरात नेहमीच वाद, भांडण, तणाव किंवा वादविवाद सुरू असतील, तर ते वाईट काळ जवळ आल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे अशा वेळेस संयम, शांतता आणि सकारात्मकता राखणं आवश्यक आहे.
चाणक्य नीतीनुसार, घरात आरसा किंवा काच स्वतःहून तुटणं अत्यंत अशुभ मानलं जातं. हे कामात अडथळा किंवा संकट येण्याचं लक्षण असतं. तुटलेला आरसा घरात ठेवल्यास दारिद्रय वाढते, म्हणून तो लगेचच घराबाहेर काढावा.
ही तीन चिन्हं लहान सामान्य वाटत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करू शकता. अशा वेळी सावधगिरी बाळगणे आणि नकारात्मक उर्जेला दूर ठेवण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
घर स्वच्छ, प्रसन्न आणि उजेडात ठेवा. रोज सकाळी तुळशीला पाणी द्या, दिवा लावा आणि सकारात्मक मंत्राचा जप करा. यामुळे घरातील ऊर्जा संतुलित राहते.
घरातील देवघरात स्वच्छता ठेवल्याने नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो. दररोज देवदर्शनाने मन स्थिर होतं.