Papad Curry Recipe: कुरकुरीत पापडाची राजस्थानी स्टाइल झणझणीत भाजी कधी खाल्लीये का? वाचा सोपी रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

झटपट पापडाची रेसिपी

घरात अचानक पाहुणे आले आणि भाजीच नाही? मग ही राजस्थानची प्रसिद्ध पापडाची भाजी ठरेल सगळ्यात बेस्ट. काही मिनिटांत तयार होणारी ही डिश फक्त स्वादिष्ट नाही तर प्रोटीनने भरलेली आहे.

Papad Curry Recipe | recipe

साहित्य

४-५ भाजलेले किंवा तळलेले पापड, २ टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, १ बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला १ टोमॅटो, हिरवी मिरची २, लसणाच्या पाकळ्या, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, मीठ, तेल, कोथिंबीर आणि पाणी.

Papad Curry Recipe | recipe

स्टेप १

सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करून घ्या. मग त्यामध्ये कांदा, मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घालून त्यांना सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.

Papad Curry Recipe

स्टेप २

एकदा का कांद्याला सोनेरी रंग आला की लगेचच त्यामध्ये टोमॅटो घालून परता. याला पूर्ण मऊ होईपर्यंत परतवून घ्या.

Papad Curry Recipe

स्टेप ३

टोमॅटो सॉफ्ट झाला की त्यामध्ये सगळे मसाले घालून व्यवस्थित परतून घ्या. मसाले घातल्यावर गॅस स्लो करा. अन्यथा तुमची फोडणी करपू शकते.

Papad Curry Recipe

स्टेप ४

दही घालून पटकन ढवळा, त्यामुळे ते फाटणार नाही. थोडं पाणी घालून ग्रेव्ही उकळू द्या. शेवटी पापडाचे तुकडे टाकून २ मिनिटे शिजवा.

Papad Curry Recipe

स्टेप ५

गॅस बंद करून कोथिंबीर घाला आणि गरम भात किंवा फुलक्यासोबत सर्व्ह करा. ही रेसिपी मटणापेक्षाही चवीला उत्तम लागते.

Papad Curry Recipe

लक्षात ठेवा

खूप वेळ शिजवू नका, नाहीतर पापड मऊ होतात. दहीऐवजी क्रीम वापरल्यास आणखी रिच चव येते. ही भाजी दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात उत्तम लागते.

Papad Curry Recipe

NEXT: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

Marwadi Garlic Chutney Recipe | google
येथे क्लिक करा