Personal Loan  Saam Tv
बिझनेस

Personal Loan : पर्सनल लोन घेताना या ४ गोष्टींकडे दुर्लक्ष करु नकाच, अन्यथा कर्ज फेडताना येईल नाकी नऊ

Personal Loan on Low Credit Score : वेळेवर EMI न भरल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल.

कोमल दामुद्रे

How to get Personal Loan :

पैशांची अधिक प्रमाणात चणचण भासू लागली की, आपण जवळच्या व्यक्तींकडून उधारी घेतो. पण बरेचदा आर्थिक मदत न मिळाल्यास आपल्या डोक्यात बँकेतून पर्सनल लोन घेण्याचा विचार येतो.

परंतु, बँकेतून कर्ज घेताना आपण अशा अनेक चुका करतो की, कर्ज फेडताना आपल्याला नाकी नऊ येतात. पर्सनल लोनवर मिळणारा व्याजदर देखील अधिक प्रमाणात असतो. ज्यामुळे कर्ज घेताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. जर भविष्यात तुम्ही पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. गरजेनुसार कर्ज घ्या

कर्ज (Loan) घेतल्यानंतर आपल्याला खूप दिलासा मिळतो. परंतु, परतफेड करताना आर्थिक बोझा वाढतो. कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी तुमचा पगार (Salary), कौटुंबिक गरजा आणि जबाबदाराची काळजीपूर्वक विचार करा. कर्ज तितकेच्या घ्या जितके तुम्ही पूर्ण करु शकता.

2. व्याजदरांची तुलना

पर्सनल लोन घेताना कोणती बँक (Bank) किती व्याजदर देते या गोष्टींकडे लक्ष द्या. इतर बँकासोबत व्याजदारांची तुलना करा. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. बँकेच्या वेबसाइटवरून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. यामुळे तुमच्या EMI चा भार कमी होईल.

3. EMI कसा भराल

ज्या बँकेतून कर्ज घेणार असाल त्यानुसार व्याजदर कॅल्क्युलेट करा. ज्यामुळे EMI भरता येईल. यावरुन तुम्हाला दरमाह किती EMI भरावा लागेल याची कल्पना येईल. तुमचा पगार, इतर खर्च सांभाळून तुम्ही EMI भरु शकता.

4. क्रेडिट स्कोअरकडे लक्ष द्या

पर्सनल लोन घेताना EMI चा हप्ता वेळेवर भरा. वेळेवर EMI न भरल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल. त्यामुळे भविष्यात पुन्हा लोन घेताना अडचणींचा सामना करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

SCROLL FOR NEXT