Best Places To Visit In Winter: बर्फाच्छादित डोंगर अन् हिरवळ असलेल्या 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Tourism Places: हिवाळ्यात सर्वजण हिल स्टेशनवर फिरायला जातात.
Tourism Places
Tourism PlacesSaam Tv
Published On

Places To Visit In Winter:

नोव्हेंबर महिना सुरु झाला असून हलक्या थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसात बाहेर फिरायला जाण्याची मज्जा काही वेगळीच असते. हिवाळ्यात सर्वजण हिल स्टेशनवर फिरायला जातात. गर्दी झाडी अन् निसर्गरम्य वातावरणात हिल स्टेशनला जाण्याचा प्लान करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत. त्यामुळे फिरायला जाण्यासाठी हा बेस्ट टाइण आहे. आज आम्ही तुम्हाला थंडीत फिरायला जाण्यासाठी काही हिल स्टेशनची माहिती देणार आहोत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. कुफरी, हिमाचल प्रदेश

कुफरी हे शिमलामधील एक निसर्गरम्य शहर आहे. जर तुम्हाला शहरातील गजबजाटापासून दूर जायचे असेल तर कुफरी हे तुमच्यासाठी खूप चांगली जागा आहे. कुफरी हे हनीमूनसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही थंडीसोबतच निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतात.

2. मनाली, हिमाचल प्रदेश

हिवाळ्यात बर्फ हिरवळ अशा दोन्ही गोष्टी तुम्ही एकाच ठिकाणी अनुभवू शकतात. फिरायला जाण्यासाठी मनाली हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही हिडिंबा देवी मंदिर, मनाली सेंच्युरी आणि मॉल रोड येथे फिरु शकतात. येथे तुम्हाला बर्फाच्छादित डोंगल पाहू शकतात. सुंदर वातावरण, निळे आकाश असे हे ठिकाण कोणत्या स्वर्गापेक्षा कमी नाही.

Tourism Places
Honda Livo: 60 Kmpl चा जबरदस्त मायलेज; किंमत 80 हजारपेक्षा कमी; जाणून घ्या कशी आहे Honda ची 'ही' स्मार्ट बाईक

3. मसुरी, उत्तराखंड

थंडीत फिरण्यासाठी मसुरी हे उत्तम ठिकाण आहे. येथील केप्लटी फॉल्स, कंपनी गार्डनला तुम्ही नक्की भेट द्या. हिवाळ्यात हे शहर खूप सुंदर दिसते.

4. पंगोट, उत्तराखंड

हिवाळ्यात तुम्ही पंगोटला भेट देऊ शकता. उत्तराखंडमधील हे शहर खूप सुंदर आहे. नैनितालपासून अवघ्या ४५ मिनिटांच्या अंतरावर ही जागा आहे. येथे तुम्हाला खूप शांतता मिळेल. निसर्गित सौंदर्यासोबत ही जागा पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Tourism Places
Chanakya Niti On Money : आयुष्यात ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही पैशांची कमतरता होणार नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com