Uttarakhand Accident News: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! भाविकांची जीप ६०० फूट दरीत कोसळली; ९ जणांचा जागीच मृत्यू

Uttarakhand Jeep Accident News: उत्तराखंडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी जाणारी भाविकांची जीप अचानक खोल दरीत कोसळली. या घटनेत ९ भाविकांचा जागीच मृत्यू झाला
Uttarakhand Jeep Accident News
Uttarakhand Jeep Accident NewsSaam TV
Published On

Uttarakhand Jeep Accident News: उत्तराखंडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी जाणारी भाविकांची जीप अचानक खोल दरीत कोसळली. या घटनेत ९ भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन भाविक गंभीर जखमी झाले. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

Uttarakhand Jeep Accident News
Darshana Pawar Death Case: दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठी अपडेट, मित्र राहुल हांडोरेला अटक

या घटनेनं परिसरातून (Uttarakhand) मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जीपमधील सर्व प्रवासी बागेश्वर येथील रहिवासी आहेत. गुरूवारी ते शामा येथून होकरा मंदिरात दर्शनासाठी जीपने निघाले होते. दरम्यान, मसुरी-होकरा मोटरवेवरील पुरवठा गोदामाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

काही कळण्याच्या आतच जीप सुमारे ६०० फूट दरीत कोसळली. या भयानक (Accident) घटनेत ९ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन भाविक गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच आसपासच्या परिसरातील नागरिकांची गर्दी जमली. पोलिसांना या अपघाताचे वृत्त कळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी तातडीने बचावपथकाच्या मदतीने भाविकांचे मृतदेह बाहेर काढले. तसेच गंभीर जखमी झालेल्या भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, उतराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातानंतर दु:ख व्यक्त केले आहे. बागेश्वर येथील शामा येथून पिथौरागढमधील नाचनीकडे येणाऱ्या भाविकांच्या जीपला अपघात झाल्याचं वृत्त अतिशय वेदनादायी आहे. घटनास्थळी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहेत. मृतांच्या आत्म्यांना शांती मिळो, हीच ईश्वरच चरणी प्रार्थना असं ट्वीट मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केलं आहे.

Edited by - Saatish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com