Monsoon Update Today: अख्ख्या देशात पावसाचं तांडव! उत्तराखंड, हिमाचलमध्ये रौद्ररूप; मुंबईची उडवली दैना

Monsoon Update:डोंगराळ भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे.
Monsoon Update Today
Monsoon Update TodaySaam TV
Published On

Monsoon Update: संपूर्ण देशात वरुन राजाने हजेरी लावली आहे. जून महिन्याच्या शेवटी दडी मारुन बसलेला पाऊस आता चांगलाच बरसतोय. पावसामुळे मुंबईकरांची मात्र दाणादाण उडालीये. तसेच डोंगराळ भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे.

उत्तराखंडमध्ये निसर्गाचा कोप

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) देखील मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसाने डोंगराळ भागातील जमीन भुसभुशीत झालीये. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. नागरिकांचे यात मोठे नुकसान होतेय. घराबाहेर पडणे कठीण झाले असून नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

शिमल्यात ढगफुटी

हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. येथे अनेक शहरांमध्ये ढगफुटी झाली आहे. अचानक ढगफुटी झाल्याने लाखोंचे नुकसान यात होत आहे. शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये रविवारी ढगफुटी झाल्यने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलन आणि हमीरपूर या ठिकाणी देखील पूर आल्याने अनेक वाहने पाण्यात वाहून गेली आहेत.

यामुळे येथे असलेल्या नागरिकांसह पर्यटकांना देखील ढगफुटीचा सामना करावा लागत आहे. कुल्लूममधील मोहल या ठिकाणी अचानक झालेल्या ढगफुटीने वाहने एका मोठ्या खड्ड्यात अडकून पडली आहेत. सकाळपासूनच ही वाहने जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

मुंबईत दोघांचा मृत्यू

मुंबईसह (Mumbai) उपनगरांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. मुंबईकरांची याने मोठी दैना झाली. अशात धो-धो कोसळत असलेल्या पावसाने मुंबईत दोन ठिकाणी इमारतीचा काही भाग कोसळल्याच्या घटना घडल्यात. यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झालाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com