Personal Loan Increase : RBI चा मोठा निर्णय! पर्सनल लोन घेणं झालं कठीण, मोजावे लागणार अधिक पैसे

RBI New Rule : भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे.
Personal Loan Increase
Personal Loan IncreaseSaam Tv
Published On

RBI Big Decision :

कोरोनानंतर भारतात पर्सनल लोन घेणाऱ्यांमध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळाली. सामान्य माणूस मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असेल तेव्हा पर्सनल लोनचा आधार घेतो. परंतु, आता पर्सनल लोन घेणं कठीण होणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. क्रेडिट कार्डवर कर्ज घेताना शेड्युल्ड कमर्शियल बँका आणि NBFCs द्वारे रकमेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे वैयक्तिक कर्ज घेणे महाग होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

RBI ने ग्राहक क्रेडिटवरील रिस्क वेट १०० टक्क्यांवरुन १२५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. याचा अर्थ असा की, यामध्ये २५ टक्क्यांना वाढ करण्यात आली आहे. पूर्वी बँकांना (Bank) प्रत्येक १०० रुपये कर्जासाठी ९ रुपये भांडवल राखणे आवश्यक आहे. परंतु, या किमतीत सध्या वाढ झाली आहे. आता यावर ११.२५ रुपये ठेवण्यात येतील.

Personal Loan Increase
SBI Bank Recruitment 2023 : सरकारी खात्यात नोकरीची संधी! SBI मध्ये ८००० जागांसाठी पदभरती सुरु, कसा कराल अर्ज?

क्रेडिट कार्ड (Credit Card) मिळवण्यासाठी RBI आणि NBFCs याची रिस्क वेट १०० टक्क्यांपेक्षा कमी आहे. ज्यांमुळे बँक कर्जावरील रिस्क रेट वाढवला आहे. यामध्ये गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वाहन कर्ज तसेच सोने-चांदीच्या दागिन्यांवर हे कर्ज लागू होणार नाही.

Personal Loan Increase
Home loan Insurance : गृहकर्जासोबत इन्शुरन्स घेणे का गरजेचे? याचा फायदा कसा होतो? जाणून घ्या

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी म्हटले की, क्रेडिट कार्डवरील कर्जांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यांनी कमर्शियल आणि बँकिंग वित्तीय कंपन्यांना त्यांच्या अंतर्गत देखरेखीत वाढत्या जोखीमला सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये मायक्रो फायनान्स कर्ज आणि बचत गटांना देण्यात आलेले कर्जाचे टक्केही वेगळे ठेवण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com