Dearness Allowance Hike Saam Tv
बिझनेस

Dearness Allowance Hike : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; लाभ नेमका कोणाला, किती वाढणार पगार?

Dearness Allowance Increased: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता दिली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ केली आहे. १ जुलै २०२३ पासून ती लागू होणार आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १५ टक्क्यांवरून आता १८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dearness Allowance Incresed 5th pay Commission And 6th Pay Commission :

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता दिली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ केली आहे. १ जुलै २०२३ पासून ती लागू होणार आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १५ टक्क्यांवरून आता १८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. याचा लाभ पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे.

अर्थ मंत्रालयाच्या निवेदनानुसार, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या निवेदनात सार्वजनिक उपक्रम विभागातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ झाल्याचे म्हटले आहे.

सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात वाढ

एका रिपोर्टनुसार, निवेदनात म्हटले आहे की, सहाव्या वेतन आयोगापूर्वी सुधारित वेतनश्रेणी आणि ग्रेड प्राप्त असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. तो २१२ टक्क्यांहून आता २३० टक्क्यांवर करण्यात आला आहे. म्हणजे महागाई भत्त्यात १८ टक्क्यांनी वाढणार आहे. १ जुलै २०२३ पासून हा वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे. १८ टक्के महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात ७ हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

पाचव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता

CPSEs कर्मचार्‍यांचे वेतन पाचव्या वेतन आयोगानुसार CDA पॅटर्न पे स्केलवर वाढवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. एका भागात, ज्या कर्मचाऱ्यांनी ५० टक्के महागाई भत्ता विलीनीकरणाचा लाभ घेतलेला नाही त्यांचा महागाई भत्ता ४६२ टक्के वरून ४७७ टक्के करण्यात आला आहे. तर दुसऱ्या भागात, ५० टक्के महागाई भत्ता विलीनीकरणाचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४१२ टक्क्यांवरुन ४२७ टक्के करण्यात आला आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता

सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्यात आला आहे. ही वाढ १ जुलै २०२३ पासून लागू होणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ जाहीर केली होती. मात्र, आता सहाव्या आणि पाचव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात होणारी वाढ जाहीर केली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ५ दिवस पुन्हा अवकाळी, उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ८ दिवसात खुशखबर मिळणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Phaltan Female Doctor Case: महिला डॉक्टरवर बीडमध्ये अंत्यसंस्कार, आई-बापाचा काळीज चिरणारा आक्रोश | VIDEO

Mangal Gochar 2025: 27 ऑक्टोबरपासून 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; मंगळ ग्रह करणार स्वतःच्याच राशीत प्रवेश

Success Story: जर्मनीतील नोकरी सोडली, भारतात रिसेप्शन म्हणून काम केले, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS पूजा यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT