RBI Penalty On Banks: आरबीआयचा ३ मोठ्या बँकाना धक्का; तब्बल 10 कोटींचा दंड

RBI Bank News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला. बँकेने सिटी बँक, बँक ऑफ बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँक या ३ मोठ्या बँकांना कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे.
RBI Penalty On Citi Bank And Bank Of baroda
RBI Penalty On Citi Bank And Bank Of barodaSaam Tv
Published On

RBI Penalty On Citi Bank Bank Of baroda And IOB:

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला. बँकेने सिटी बँक, बँक ऑफ बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँक या ३ मोठ्या बँकांना कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. तब्बल १०.३४ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत आरबीआयने माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, सिटी बँकेवर (Citi Bank) ठेवीदार शिक्षण (Depositer Education) आणि जागरुकता निधी (Awareness Fund Scheme) योजनेशी संबंधित निकषांचे पालन न केल्याप्रकरणी आणि वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगवरील आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. (RBI Penalty On Banks)

आरबीआयने सिटी बँकसह बँक ऑफ बडोदालाही (Bank Bank Of baroda) दंड आकारला आहे. डिपॉझिटरी ऑफ लार्ज कॉमन एक्स्पोजर (Deository Of Large Common Exposures) निर्मितीसंबंधित काही निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ कोटीचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहितीही देण्यात आली.

बँक ऑफ बडोदानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेलाही दंड ठोठावला आहे. चैन्नईतील या बँकेला कर्ज (Bank Loan) आणि अॅडव्हान्सच्या (Advances) निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल १ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. (RBI Bank)

RBI Penalty On Citi Bank And Bank Of baroda
Bank News: बँकेतून मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढताय? भरावा लागेल दंड, वाचा सविस्तर

या तिन्ही प्रकरणांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहिती दिली. नियंमाचे पालन न झाल्याप्रकरणी हा दंड आकारण्यात आला आहे. बँकानी ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले.

RBI Penalty On Citi Bank And Bank Of baroda
Abhyudaya Cooperative Bank: आरबीआयची मोठी कारवाई; अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ केलं बरखास्त, कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com