Satish Daud
सध्या बाजारात 500 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे 500 रुपयांची बनावट नोट कशी ओळखता येईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी लोकांना 500 रुपयांच्या बनावट नोटा कशा ओळखायच्या याची माहिती देते.
500 रुपयांच्या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आहे.
नोटेवर मागच्या बाजूला ठसठशीत आकारात भारतीय वारसा सांगणारी वास्तू लाल किल्ला छापलेला आहे.
500 रुपयांच्या नोटेवर पुढच्या बाजूला प्रकाश आरपार जाऊ शकेल असा छोटा भाग आहे.
ज्या मूल्याची नोट आहे ते मूल्य आकड्यात लिहिल्यावर तयार होणाऱ्या आकाराचा हा पारदर्शी भाग आहे.
500 रुपयांच्या नोटेच्या पुढच्या बाजूवर देवनागरी भाषेत तिचं 500 हे मूल्य लिहिलेलं आहे.
500 रुपयांची नोट खरी आहे हे कळावं म्हणून नोटेच्या मध्यभागी चांदीचा एक धागा आहे. या धाग्यावर 'भारत' आणि आरबीआय असे शब्द लिहिले आहेत.