Wrong UPI Payment: UPI द्वारे दुसऱ्यालाच पैसे ट्रान्सफर झाले? अशा प्रकारे झटपट मिळवा तुमचे पैसे

UPI Payment: सध्या अनेकजण युपीआयद्वारे पैशांचा व्यवहार करतात. डिजिटल पद्धतीने पेमेंट करणे आणि पैशांचा व्यवहार करणं सोपं झालं आहे. परंतु या युपीआयद्वारे पैशाचा व्यवहार करताना बऱ्याचदा चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवले जातात.
UPI Payment
UPI Paymentyandex
Published On

Wrong UPI Payment:

देशात सर्व ठिकाणी युपीआय पेमेंट वापरलं जातयं. भारतात डिजिटल पेमेंट पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जातेय. या युपीआय पेमेंट पद्धतीने काही सेकंदात तुम्ही कोणालाही पैसे पाठवू शकतात किंवा बिल पेमेंट करू शकतात. या पेमेंट पद्धतीने परदेशी लोकांना भूरळ घातलीय. पण हे पेमेंट करताना काही चुका होण्याची शक्यता असते. घाई गरबडीत ज्या व्यक्तीला पेमेंट किंवा पैसे पाठवायचे आहेत त्याऐवजी चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवले जाण्याची शक्यता खूप जास्त असते. (Latest News)

दुसऱ्याच व्यक्तीला पैसे पाठवले गेल्यानंतर अनेकजण टेन्शन घेत असतात. परंतु वाचक मित्रांनो जर तुमच्याकडून दुसऱ्याच व्यक्तीला पैसे पाठवले गेले असतील तर चिंता करण्याचे काम नाही. दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेले पैसे परत तुमच्या खात्यात जमा होतील, त्यासाठी फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चुकीच्या युपीआयवर पैसे पाठवले तर काय करावे

जर समजा घाई गडबडीत तुमच्याकडून दुसऱ्याच व्यक्तीला युपीआयद्वारे पेमेंट केले गेले. तर लगेच बँकेच्या कस्टमर सर्व्हिस सेंटरला संपर्क करावा. किंवा तुम्ही युपीआय सर्व्हिस देणाऱ्या कंपनीशीही संपर्क करू शकतात. टोल फ्री नंबर 18001201740 वर फोन करून तुम्ही चुकीच्या पेमेंटची तक्रार करू शकतात. आरबीआयने याविषयीच्या सुचना दिल्या आहेत. आरबीआयनुसार, पेमेंट सर्व्हिस देणाऱ्याला तुमचं पेमेंट चुकीच्या युपीआयवर झालं आहे, याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील.

तुम्ही NPCI पोर्टलद्वारे ही तक्रार दाखल करू शकतात. पोर्टलवर जाऊन तुम्हाला What We Do या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तेथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. त्यापैकी UPI चा पर्याय निवडा. आता तक्रार विभागात जा आणि सर्व माहिती द्या. ज्यामध्ये तुम्हाला तुमची बँक नाव, UPI आयडी, फोन नंबर, ईमेल आयडी सारखी माहिती भरावी लागेल. तुमच्या तक्रारीच्या 30दिवसांनंतरही तुम्हाला पैसे परत मिळाले नाहीत, तर तुम्ही बँकेत तक्रार करून पैसे परत मिळवू शकता.

चुकीचा व्यवहार झाला तर लगेच बँकेला आणि युपीआय सेवा देणाऱ्या कंपनीला कळवावे. व्यवहार झाल्यानंतर तीन दिवसांत तक्रार करणे बंधनकारक आहे. यानंतर तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शाश्वती नसते.

UPI Payment
Google Pay, Paytm, UPI च्या युजर्संना झटका! 31 डिसेंबरनंतर व्यवहार होणार ठप्प, NPCI ची मोठी घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com