Google Pay, Paytm, UPI च्या युजर्संना झटका! 31 डिसेंबरनंतर व्यवहार होणार ठप्प, NPCI ची मोठी घोषणा

Online Payment News : तुम्ही देखील UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे.
Online Payment
Online Payment Saam Tv
Published On

NPCI Circular :

तुम्ही देखील UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI यूजर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहिर केली आहेत. सरकारने (Government) म्हटले आहे की, निष्काळजीपणामुळे तुमचे UPI खाते आणि UPI आयडी बंद होऊ शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

NPCI च्या मार्गदर्शकामध्ये काय आहे?

NPCI ने आपल्या नवीन मार्गदर्शकात म्हटले आहे की जर UPI यूजर्सने (Users) त्याच्या UPI खात्यातून एक वर्ष कोणताही व्यवहार केला नाही तर त्याचा UPI ID बंद केला जाईल. जर एखाद्या यूजर्सने या कालावधीत त्याची शिल्लक देखील तपासली तर त्याचा आयडी ब्लॉक केला जाणार नाही.

NPCI म्‍हणाले, 'डिजिटल पेमेंटच्‍या क्षेत्रात सुरक्षित व्‍यवहाराचा अनुभव सुनिश्चित करण्‍यासाठी ग्राहकांनी बँकिंग प्रणालीमध्‍ये नियमितपणे त्‍यांच्‍या माहितीचे पुनरावलोकन आणि पडताळणी करण्‍याची आवश्‍यकता आहे. यूजर्स त्यांच्या खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर बदलतात पण त्या नंबरशी लिंक (Link) केलेले UPI खाते बंद करत नाहीत.'

UPI यूजर्सना सुरक्षित अनुभव प्रदान करणे हा या मार्गदर्शकाचा उद्देश आहे. या वर्षीही अनेक UPI खाती निष्क्रिय असतील. हे 31 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल. NPCI या संदर्भात UPI यूजर्सना ई-मेलद्वारे अलर्ट पाठवेल.

Online Payment
Online Fraud : स्पॅम कॉलर्सना तुमचा नंबर कुठून मिळतो? जाणून घ्या सविस्तर

हे काम थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडरला करावे लागेल -

परिपत्रकातील नवीन मार्गदर्शकानुसार, थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर (TPPs) आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर (PSPs) यांना पुढील गोष्टी कराव्या लागतील आणि 31 डिसेंबर 2023 पर्यंत त्याची अंमलात आणावे लागेल. सर्व TPAP आणि PSP बँकांना UPI आयडी आणि संबंधित UPI नंबर आणि त्या ग्राहकांचा फोन नंबर verify करण्यास सांगण्यात आले आहे. ज्यांनी 1 वर्षापासून UPI ​​अ‍ॅप्सद्वारे कोणतेही आर्थिक (डेबिट किंवा क्रेडिट) किंवा गैर-आर्थिक व्यवहार केले नाहीत.

Online Payment
Online Fraud: सावधान..ॲमेझॉनवरून ग्राहकाची फसवणूक; ऑर्डर केला मोबाईल मिळाले कपडे धुण्याचे २ साबण
  • अशा ग्राहकांचा UPI ID आणि UPI क्रमांक इनवर्ड क्रेडिट व्यवहारांसाठी deactive केला जाईल. याचा अर्थ त्यांना या क्रमांकांवर पैसे मिळू शकणार नाहीत. याव्यतिरिक्त, PSPs देखील UPI वरून त्याच फोन नंबरची नोंदणी रद्द करतील.

  • ज्या ग्राहकांच्या UPI आयडी आणि फोन नंबरवर इनकमिंग क्रेडिट ब्लॉक आहे त्यांनी UPI मॅपर लिंकेजसाठी त्यांच्या UPI अ‍ॅपमध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार UPI पिन वापरून पेमेंट आणि गैर-आर्थिक व्यवहार करता येतात.

  • UPI अ‍ॅप्स '-टू-कॉन्टॅक्ट' आणि 'पे टू मोबाइल नंबर' सुरू करण्यापूर्वी रिक्वेस्टर व्हेरिफिकेशन (ReqValAd) करेल. UPI अ‍ॅप्स व्यवहार सुरू करण्यापूर्वी घेतलेल्या ग्राहकाचे नाव प्रदर्शित करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com