Online Fraud: सावधान..ॲमेझॉनवरून ग्राहकाची फसवणूक; ऑर्डर केला मोबाईल मिळाले कपडे धुण्याचे २ साबण

Beed News सावधान..ॲमेझॉनवरून ग्राहकाची फसवणूक; ऑर्डर केला मोबाईल मिळाले कपडे धुण्याचे २ साबण
Online Fraud
Online FraudSaam tv
Published On

बीड : आतापर्यंत आपण ऑनलाईन खरेदी करताना एक ना अनेक ग्राहकांची फसवणूक झालेल्या बातम्या पाहिल्या असतील एक ना अनेक वेबसाईट आणि ॲपवरून ग्राहकांच्या फसवणूक झालेल्या आहेत. मात्र जगभरात विश्वास संपादन केलेल्या (Amazon) अमेझॉनकडूनच आता फसवणूक झाल्याचा प्रकार (Beed) बीडमध्ये समोर आला आहे. (Breaking Marathi News)

Online Fraud
Beed News: घरात सुरु होती चिमुकल्याच्या वाढदिवसाची तयारी; इकडे पित्याचे धक्कादायक कृत्य

बीड शहरात राहणाऱ्या रमेश प्रभाकर गायकवाड यांनी २९ जून रोजी ॲमेझोनवरून मोबाइल मागविला होता. त्यांना २ जुलै रोजी पार्सल आले. त्यांनी ते उघडण्याआधीच संबंधित खात्यावर २९ हजार रुपये ऑनलाइन जमा केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पार्सलचा बॉक्स उघडला. मात्र बॉक्स उघडताच त्यांना धक्काच बसला. या बॉक्समध्ये मोबाइलऐवजी कपडे धुण्याचे २ साबण आढळल्या. हे पाहून ग्राहकाला धक्काच बसला. रमेश गायकवाड यांनी लगेच, पोलीस अधीक्षक कार्यालयात असणारे सायबर ठाणे गाठत तक्रार केली.

Online Fraud
Palghar News: वैतरणा रेल्वे पुलाखाली आढळला तरुणीचा मृतदेह


ग्राहकाला पैसे केले परत 
तर याविषयी सायबर पोलीस अधिकारी अमितकुमार जोगदंड म्हणाले, की रमेश गायकवाड यांनी आमच्याकडे आपली अमेझॉनकडून फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर आम्ही अमेझॉन कंपनी आणि अमेझॉन कंपनीच्या माध्यमातून ज्या डीलरने हे पार्सल पाठवलं होतं. त्या दोघांनाही मेल केला. (Cyber Police) विचारपूस केली आणि फसवणूकदाराचे पैसे परत करण्यात सांगितलं. त्यानंतर अमेझॉन कंपनीकडून रमेश गायकवाड यांचे २९ हजार रुपये परत देण्यात आले आहेत. ऑनलाईन काही खरेदी करत असाल. त्यावेळेस पूर्ण खात्री केल्यानंतरच खरेदी करावी; असे आवाहन त्यांनी केले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com