Debit-Credit Card Rule Change Saam Tv
बिझनेस

Rule Change From 1st April: क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून 'हे' नियम बदलणार

Debit-Credit Card Rule Change From 1st April 2026: क्रेडिट कार्डच्या नियमात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता विमानतळावरील लाउंज प्रवेश बंद केला जाणार आहे. १ एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार आहे.

Siddhi Hande

१ एप्रिलपासून अनेक नियमात बदल

क्रेडिट आणि डेबिट कार्डचे नियम बदलले

१ एप्रिलपासून विमानतळावर लाउंज बंद

भारतातील अनेकजण डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरतात. डेबिट आणि क्रेडिटबाबतचे नियम १ एप्रिलपासून बदलणार आहे. यामध्ये विमानतळ लाउंज प्रवेशाच्या नियमात बदल केले आहे. डेबिट आणि कार्ड वर देण्यात येणाऱ्या एअरपोर्ट लाउंज प्रवेशाबाबत काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहे. अनेक बँकांनी त्यांच्या रिवॉर्ड स्ट्रक्चरमध्ये बदल केला आहे. त्यामुळेच डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केले आहे.

नॅशनल पेमेंट्स ऑफ इंडियाच्या नवीन नियमांनुसार, काही कार्डंवर मिळणारी कॉम्प्लिमेंटरी लाउंज एन्ट्री रद्द करण्यात आली आहे. तर काही कार्डांच्या खर्चावर आधारित असणार आहे. याचा लाखो कार्डधारकांवर परिणाम होणार आहे.

एनपीसीआयने बँकांना १ एप्रिलपासून रुपे प्लॅटिनम कार्डवर देण्यात येणारे लाउंज प्रवेश बंद करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे कार्डधारक यापुढे देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर लाउंज सर्व्हिस वापरु शकत नाही. अनेक बँकांनी ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे.

पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी, पंजाब अँड सिंध बँक, ईएलएएफ स्मॉल फायनान्स बँकेनेही याबाबत माहिती दिली आहे. रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्डवरील लाउंज बंद केला जाणार आहे. तसेच यासाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्हाला लाउंजमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर रुपे सिलेक्ट कार्डधारकांना तिमाहीत ५००० रुपये खर्च करणे आवश्यक आहे.

कॅशबॅकचे नियम बदलणार

नवीन नियमांनुसार कार्डधारकांना एअरटेल मोबाईल, ब्रॉडबँक आणि डीटीएच पेमेंटवर २ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. युटिलिटी बिल पेमेंटवरदेखील १०टक्के कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे युजर्सवर याचा परिणाम होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT