Credit Card Saam Tv
बिझनेस

Credit Card: क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! आता लिमिटपेक्षा जास्त खर्च करु शकणार नाहीत, बँकांना दिले निर्देश

Credit Card Limit Rules: क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आले आहे. आता क्रेडिट कार्डधारकांना ओवरलिमिट फीचर त्यांच्या मर्जीनुसार ऑन आणि ऑफ करता येणार आहे. यामुळे खर्चावर मर्यादा येणार आहेत.

Siddhi Hande

क्रेडिट कार्डच्या नियमात बदल

आता ओव्हरलिमिट फीचर बंद

ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार सुरु करता येणार

सध्याच्या काळात लाखो लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्ड वापरुन तुम्ही खरेदी करु शकतात. दरम्यान, क्रेडिट कार्डवर खर्चाची लिमिट असते. ही लिमिट जर ओलांडली तर तुमच्याकडून दंड वसूल केला जातो. दरम्यान, आता बँकांनी क्रेडिट कार्डधारकांना दिलासा दिला आहे.

जर खर्च क्रेडिट कार्डपेक्षा जास्त झाला तर दंड आकारला जात होता. यामुळे अनेक तक्रारी केल्या होत्या. यामुळेच रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहक खर्च कंट्रोलमध्ये ठेवण्यात आला आहे.

विनामंजुरी ओवरलिमिट सुविधा बंद (Credit Card Over limit Feature Stopped)

नवीन गाइडलाइन्सनुसार, आता बँकांच्या परवानगीशिवाय ग्राहक सहमतीशिवाय ओवरलिमिट फीचर अॅक्टिव्ह करु शकत नाही. याआधी बँक ही सुविधा ऑटोमॅटिक पद्धतीने सुरु करायचे. ज्यामुळे ग्राहक लिमिटपेक्षा जास्त खर्च करायचे. यानंतर आता रिझर्व्ह बँकेने ही सुविधा पूर्णपणे बंद केली आहे.

आता ग्राहक हे फीचर त्यांच्या सुविधेनुसार सक्रिय करु शकणार आहेत. ग्राहकांना अॅप, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल प्लॅटफॉर्म कंट्रोल फीचर असणार आहे. यामुळे ग्राहक कधीही ते हे फीचर सुरु आणि बंद करु शकतात. जे ग्राहक चुकून जास्त खर्च करतात त्यांच्यासाठी हे फीचर अत्यंत उपयोगी आहे.

ओवरलिमिट फीचर सुरु आहे की नाही? असं करा चेक (Credit Card Overlimit Feature)

तुम्हाला कार्ड किंवा मोबाईल अॅपवर जायचे आहे. तिथे कार्ड मॅनेज सेक्शनवर क्लिक करा. यानंतर "Overlimit" किंवा "Limit Control" ऑप्शन दिला असेल. त्यावर क्लिक करुन तुमचे फीचर अॅक्टिव्ह आहे की नाही चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयानक! बियरच्या बाटलीत लघवी भरली अन् सोनूला पाजली, टॉर्चरचा व्हिडिओ कुटुंबाला पाठवला

Winter Diet: वजन कमी करायचंय? मग नाश्त्यात हा १ पदार्थ खा, दिवसभर पोट भरलेलं राहील

The Bhabiji Ghar Par Hain movie : चित्रपटाच्या सेटवर भयंकर अपघात; 500 किलोचे झाड कोसळले, मुख्य कलाकारांचा जीव थोडक्यात बचावला, वाचा थरारक प्रसंग

Maharashtra Live News Update: अजित पवार घेणार पुणे महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांची बैठक

LIC Policy: LIC ची जबरदस्त योजना! महिन्याला फक्त ४४०० रुपयांचा प्रिमियम, मॅच्युरिटीवर मिळणार १६ लाख

SCROLL FOR NEXT