PM Matru Vandana Scheme: सरकारची खास योजना! गरोदर महिलांना मिळतात ११,००० रुपये; योजनेत अर्ज कसा करावा?

PM Matru Vandana Scheme: केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी पीएम मातृ वंदना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना ११,००० रुपये दिले जातात. दोन टप्प्यांमध्ये हे पैसे दिले जाणार आहेत.
PM Matru Vandana Yojana
Matru Vandana YojanaSaam Tv
Published On
Summary

पीएम मातृ वंदना योजना

गरोदर महिलांना मिळतात ११,००० रुपये

पहिल्या बाळाच्या जन्मानंतर ५००० रुपये

दुसऱ्यावेळी मुलगी झाल्यावर ६००० रुपये मिळतात

केंद्र सरकारने गरोदर महिलांसाठी एक खास योजना सुरु केली आहे. या योजनेचा नाव प्रधानमंत्री मातृ वंदना योजना असं आहे. पीएम मातृ वंदना योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते. गरोदर महिला आणि बाळाच्या संगोपनासाठी हे पैसे दिले जातात. बाळाला आणि आईला पौष्टिक आहार मिळावा, त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, या दृष्टीने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

PM Matru Vandana Yojana
Ladki Bahin Yojana: वडील-पती हयात नाही, त्या लाडक्या बहि‍णींनी e-KYC कशी करायची? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

गर्भवती महिलांना मिळतात ११,००० रुपये (Pregnant Women Will Get 11000 Rupees)

पीएम मातृ वंदना योजनेअंतर्गत महिलांना दोन टप्प्यांमध्ये पैसे दिले जातात. एकूण ११,००० रुपये दिले जातात.

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ५००० रुपये दिले जातात. यामध्ये पहिला हप्ता रजिस्ट्रेशन झाल्यावर दिला जातो. दुसरा हप्ता आरोग्य तपासणी पूर्ण केल्यानंतर आणि तिसरा हप्ता मुलाच्या जन्मानंतर लसीकरण करताना दिला जातो.

दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर ६००० रुपये दिले जातात. दुसऱ्या वेळी मुलगी जन्माला आल्यावर महिलांना ६००० रुपये दिले जातात. दोन मुलांच्या जन्मानंतर एकूण ११,००० रुपये दिले जातात.

पीएम मातृ वंदना योजना नक्की आहे तरी काय? (PM Matru Vandana Yojana)

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना गर्भवती महिलांसाठी आहे.या योजनेचे उद्दिष्ट गरोदर काळात महिलांना त्यांचे आरोग्य सृदृढ राहावे, त्यांना पोषक आहार मिळावा हे आहे. या योजनेत थेट महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात.

PM Matru Vandana Yojana
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! पत्नीसोबत एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ९,२५० रुपये

अर्ज कसा करावा?

या योजनेचा अर्ज करण्यासाठी pmmvy.wcd.gov.in या वेबसाइटवर जा.

यानंतर ऑनलाइन अर्ज करावेत.

अर्ज करताना ओळखपत्र, पासबुक, रेसन कार्ड, गर्भवती महिलेचे मेडिकल रिपोर्ट अपलोड करायची आहे.

या योजनेत १९ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांनाच लाभ मिळणार आहे.

PM Matru Vandana Yojana
Government Scheme: 'या' राज्यातील लाडकींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यात जमा होणार १०,००० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com