Shocking: इमारतीमध्ये वेश्या व्यवसाय, नवरा ग्राहक आणायचा अन् बायको...

Police Bust Prostitution Racket: गाझियाबाद पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला अटक केली. ही महिला गांजा देखील विकत होती. यासाठी या महिलेचा नवरा तिला मदत करत होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Shocking: इमारतीमध्ये वेश्या व्यवसाय, नवरा ग्राहक आणायचा अन् बायको...
Police Bust Prostitution RacketSaam Tv
Published On

Summary:

  • निर्माणाधीन इमारतीमध्ये वेश्या व्यवसाय.

  • गाझियाबाद पोलिसांनी महिलेला रंगेहाथ पकडले

  • महिकडून ४ किलो ३४ ग्रॅम गांजा जप्त

  • पोललिसांनी महिलेला केली अटक

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. महत्वाचे म्हणजे या व्यवसायामध्ये महिलेला तिचा नवरा मदत करत होता. या महिलेसाठी नवरा ग्राहक आणून देत होता. निर्माणाधीन इमारतीमध्ये ती हा व्यवसाय करत होती. आपल्या महागड्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने वेश्या व्यवसाय सुरू केला होता. पोलिसांनी या महिलेला रंगेहाथ पकडले आणि तिची रवानगी तुरूंगात केली.

Shocking: इमारतीमध्ये वेश्या व्यवसाय, नवरा ग्राहक आणायचा अन् बायको...
Crime News : MBBS च्या विद्यार्थिनीवर मित्रानेच केले अत्याचार; हॉटेलवर बोलावून बेशुद्धावस्थेत दुष्कृत्य, व्हिडिओही काढले

गाझियाबाद पोलिसांनी सांगितले की, गोपनिय माहितीच्या आधारे व्हेव सिटी पोलिस पथकांनी ही मोठी कारवाई केली. लालकुआं येथील श्रीराम कॉलनीमध्ये राहणारा कुख्यात गांजा तस्कर धर्मेंद्र प्रताप याच्या बायकोला पोलिसांनी ग्राहकासोबत रंगेहाथ पकडले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये ती वेश्या व्यवसाय करत होती. तिच्या ताब्यातून ४ किलो ३४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिच्याविरोधात वेव्ह सिटी पोलिस ठाण्यामध्ये एनडीपीएस कायद्याच्या कमल ८/२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.

Shocking: इमारतीमध्ये वेश्या व्यवसाय, नवरा ग्राहक आणायचा अन् बायको...
Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

आरोपी महिलेने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, बऱ्याच महिन्यांपासून ती बाहेरून स्वस्त दरात गांजा विकत आणत होती. तो छोट्या पॅकेटमध्ये पॅक करून विकत होते. मला त्यातून खूप नफा होत होता. या माध्यमातून मी खूप पैसा कमावत होते. मी माझ्या गरजा आणि छंद त्याद्वारे पूर्ण करत होते.' धक्कादायक बाब म्हणजे या कामात महिलेला तिच्या नवऱ्याने खूप मदत केली. तो तिला ग्राहक शोधून आणत होता. पोलिसांनी अटक केली तेव्हा ही महिला गांजा विकत होती. या प्रकरणी पोलिस महिलेचा नवरा आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या लोकांची देखील चौकशी करत आहेत.

Shocking: इमारतीमध्ये वेश्या व्यवसाय, नवरा ग्राहक आणायचा अन् बायको...
Sangli Crime : घरच्यांचा विरोध झुगारून वर्षभरापूर्वी प्रेमविवाह; काही महिन्यातच सासरच्यांचा छळ अन् घडलं भयंकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com