Crime News : MBBS च्या विद्यार्थिनीवर मित्रानेच केले अत्याचार; हॉटेलवर बोलावून बेशुद्धावस्थेत दुष्कृत्य, व्हिडिओही काढले

Delhi Crime News : दिल्लीतील १८ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीवर तिच्याच मित्राने बलात्कार केला. आरोपींनी पीडितेचे व्हिडिओ चित्रित करून तिला वारंवार ब्लॅकमेल केल्याचा आरोप असून पोलीस तपास सुरु आहे.
Crime News : MBBS च्या विद्यार्थिनीवर मित्रानेच केले अत्याचार; हॉटेलवर बोलावून बेशुद्धावस्थेत दुष्कृत्य, व्हिडिओही काढले
Delhi Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • दिल्लीतील हॉटेलमध्ये १८ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला.

  • कोल्ड्रिंकमध्ये अमली पदार्थ देऊन पीडितेला बेशुद्ध करून बलात्कार करण्यात आला.

  • आरोपींनी व्हिडिओ काढून पीडितेला वारंवार ब्लॅकमेल केलं

  • आरोपी फरार असून पोलीस तपास करत आहेत.

दिल्लीमधून धक्कदायक प्रकरण उघडकीस आलं आहे. १८ वर्षाच्या एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर तिच्या मित्राने लैंगिक शोषणा केले आहेत. धक्कदायक म्हणजे या मुलीला हॉटेलवर बोलवून तिला कोल्ड्रिंक्समधून अमली पदार्थ देण्यात आले. आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या दरम्यान व्हिडिओ चित्रित करून तिला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी मूळची हरियाणातील जींद जिल्ह्यातील रहिवासी आहे. ही विद्यार्थिनी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती. दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. ९ सप्टेंबर रोजी, एक १८ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनी तिच्या मित्राच्या जाळ्यात अडकली.

Crime News : MBBS च्या विद्यार्थिनीवर मित्रानेच केले अत्याचार; हॉटेलवर बोलावून बेशुद्धावस्थेत दुष्कृत्य, व्हिडिओही काढले
Heartbreaking : "आयुष्यात काही रसच नाही, गर्लफ्रेंडमुळे तीन वर्ष जगलो", १०वीच्या टॉपरची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

पीडितेला तिच्याच मित्राने पार्टीच्या बहाण्याने एका हॉटेलवर बोलवलं. मित्र ओळखीचा असल्याने पीडितेने डोळसपणाने विश्वास ठेवत हॉटेलवर गेली. या पार्टीदरम्यान तिच्या मित्राने कोल्ड्रिंकमध्ये अमली पदार्थ टाकले. हे कोल्ड्रिंक्स पिऊन पीडितेची शुद्ध हरपली. पीडित मुलगी बेशुद्ध झाल्यावर तिच्या मित्राने त्याच्या मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला.

Crime News : MBBS च्या विद्यार्थिनीवर मित्रानेच केले अत्याचार; हॉटेलवर बोलावून बेशुद्धावस्थेत दुष्कृत्य, व्हिडिओही काढले
Manoj Jarange : हे सर्व राहुल गांधीच्या सांगण्यावरून करता का? जरांगे पाटलांचा वडेट्टीवारांना सवाल

इतक्यावरच न थांबता या नराधमांनी तिचे व्हिडिओ देखील काढले. या व्हिडिओंचा आणि फोटोंचा वापर करून त्यांनी पीडितेला ब्लॅकमेल केले. शिवाय हे कोणाला सांगितल्यास तिचे व्हिडिओचा आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या वारंवार होणाऱ्या ब्लँकमेलिंगला कंटाळून पीडितेने ३ ऑक्टोबर रोजी मन एकवटवून पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत तिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Crime News : MBBS च्या विद्यार्थिनीवर मित्रानेच केले अत्याचार; हॉटेलवर बोलावून बेशुद्धावस्थेत दुष्कृत्य, व्हिडिओही काढले
Mumbai Costal Road : वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दणका बसणार; मुंबईतील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मोठा निर्णय

या प्रकरणी पोलिसांनी तरुणीने नोंदवलेल्या जबाबावरून आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४, कलम ६६, कलम ६९ या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील आरोपी अमनप्रीत आणि त्याचे दोन मित्र फरार आहेत. पोलिसांनी अनेक पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी छापे टाकले आहेत. लवकरच या आरोपींना जेरबंद करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com