Manoj Jarange : हे सर्व राहुल गांधीच्या सांगण्यावरून करता का? जरांगे पाटलांचा वडेट्टीवारांना सवाल

Maharashtra Politics : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे सर्व राहुल गांधींच्या सांगण्यावरून होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Manoj Jarange : हे सर्व राहुल गांधीच्या सांगण्यावरून करता का? जरांगे पाटलांचा वडेट्टीवारांना सवाल
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On
Summary
  • मनोज जरांगे यांनी वडेट्टीवार आणि काँग्रेसवर ओबीसींच्या नावाखाली राजकारण केल्याचा आरोप केला आहे

  • “राहुल गांधींच्या सांगण्यावरून सगळं सुरू आहे,” असा दावा जरांगे पाटील यांनी केला.

  • मराठा आरक्षण आणि ओबीसी मोर्च्यावरून राज्यात नवा संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे.

  • “ओबीसींचा खरा घात काँग्रेसनेच केला,” असा थेट आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.

हैदराबाद गॅजेटनुसार मराठा आरक्षणासाठी असलेला जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार ओबीसीला पाठिंबा देत मोर्चा काढत आहेत. मात्र हा मोर्चा खऱ्या अर्थान ओबीसीचा नसून, काँग्रेससाठी रचलेला आहे. ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसला मोठे करण्याचे काम सुरू असून, ते राजकारणात स्वतःला सेटल करत आहेत, असा जोरदार टोला मनोज जरांगे यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला आहे. हे सर्व राहुल गांधींच्या सांगण्यावरून केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस जीआर रद्द करण्याच्या मुद्द्यावर जरांगे म्हणाले, "मराठ्यांना नियमात असून देखील संघर्ष करावा लागत आहे. सगळे पुरावे असताना आम्हाला त्रास दिला जातो. दबावात जीआर निघत नाही आणि रद्द ही होत नाही. संविधानाच्या सर्व चौकटीत राहून काम करावे लागते. १० तारखेला निघणाऱ्या काँग्रेसच्या मोर्च्यांना समजून घ्या."

Manoj Jarange : हे सर्व राहुल गांधीच्या सांगण्यावरून करता का? जरांगे पाटलांचा वडेट्टीवारांना सवाल
Mission Moolvaat : रोजगारासाठीचं स्थलांतर थांबवण्यासाठी 'मूळवाट' मिशन सुरु, जाणून घ्या सविस्तर

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर राज्यातील धनगर, बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यावर जरांगे पाटील बोलले. “धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, बंजारा समाज असेल, यांनी एकत्र बसून समज-गैरसमज दूर करणं गरजेच आहे. जर बंजारा समाजाच्या नोंदी असतील, तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न कराव हे माझं मत आहे“ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange : हे सर्व राहुल गांधीच्या सांगण्यावरून करता का? जरांगे पाटलांचा वडेट्टीवारांना सवाल
Maharashtra Politics : मविआ आणि मनसे एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पोस्टने राजकारणात नवं वादळ

आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी," जरांगेंना AK47 द्या आणि ओबीसींचा खात्मा करा" असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला जरांगे यांनी प्रतिउत्तर देत म्हटलं आहे, " ओबीसीत ३७४ जाती आहेत, सगळं तुम्हालाच पाहिजे का? या वडेट्टीवार साहेबांच्या वक्तव्याचा ओबीसींनी विचार करणं गरजेच आहे. ओबीसींना आमच मराठ्यांच १६ टक्के आरक्षण काढून खोटं आणि बोगस आरक्षण दिलं. ओबीसींचा खरा घात कोणी केला असेल, तर येवल्याच्या अलिबाबांनी आणि काँग्रेसच्या पूर्वीच्या नेत्यांनी. त्यांना माहित होतं, १४ टक्के आरक्षण मंडल कमिशनने ओबीसींना दिल आहे. १६ टक्के आरक्षण मराठ्यांच आहे हे माहित असताना सुद्धा दिलं. ओबीसींची खरी फसवणूक, वाटोळं कोणी केलं असेल, तर ओबीसी नेत्यांनीच केल आहे. हे सगळं राहुल गांधींच्या सांगण्यावरून केले जात आहे“ असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com