वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG Price) किंमतीत वाढ केली आहे. सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो १ ते ३ रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो १ रुपयांनी वाझ झाली आहे. तर इतर शहरांमध्ये सीएनजी प्रति किलो ३ रुपयांनी वाढला आहे.
आज शेअर मार्केटमध्ये इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडवर सर्वांचेच लक्ष असणार आहे. या कंपनीने सीएनजीच्या किंमत (CNG Price Hike) १ ते ३ रुपयांनी वाढ केली आहे. जून २०२४ नंतर तब्बल दहा महिन्यांनी पहिल्यांदाच सीएनजीच्या किंमती वाढणार आहे.
आयजीएसलच्या एकूण सीएनजी विक्रीपैकी ७० टक्के विक्री ही दिल्लीतून होते. बाकीचे ३० टक्के इतर ठिकाणांवरुन येते. सीएनजीचे दर वाढल्यानंतर दिल्लीत सीएनजी ७६.०९ प्रति किलोवर विकले जात आहे. तर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजी ८४.७० रुपये प्रति किलोवर विकले जात आहे.मुंबईत आज सीएनजी ७७ रुपये प्रति किलोवर विकले जात आहे. (CNG Price Today In Mumbai)
आज सीएनजीच्या किंमती वाढल्याने वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. भारतात सीएनजीवर चालणाऱ्या अनेक गाड्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सीएनजी कार खरेदीत वाढ झाली आहे. मात्र, आता सीएनजीच्या किंमतीतही वाढ झाल्याने वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे. सीएनजीच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट मात्र कोलमडणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.