Shreya Maskar
'बिग बॉस १९'चा विजेता अभिनेता गौरव खन्ना ठरला. GK ने आपल्या स्टाइलने आणि मेहनतीने प्रेक्षकांची मने जिंकून हे घवघवीत यश मिळवले आहे.
गौरव खन्ना हा टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. प्रेक्षक त्यांना गेले अनेक काळापासून पाठिंबा देत आहेत.
गौरव खन्नाने या आधी देखील अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. ज्यामुळे त्याच्याकडे गेम खेळण्याचा अनुभव होता. तो अलिकडेच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ 2025' चा विजेता देखील ठरला.
'बिग बॉस १९'च्या घरात असताना गौरव खन्नाचे नेतृत्वगुण प्रेक्षकांना खूप आवडले. टास्कदरम्यान टीमला एकत्र ठेवण्याची ताकद त्यांच्यात होती. तो कायम टास्क दरम्यान स्पर्धकांना पाठिंबा देताना दिसला. घरातील सदस्यांना त्यांनी कायम प्रोत्साहन दिले.
अनेक वर्ष मालिकांमध्ये काम केल्यामुळे गौरव खन्ना प्रेक्षकांचा ओळखीचा चेहरा बनला आहे. त्याचे व्यक्तिमत्व प्रेक्षकांना प्रभावी वाटते. त्यामुळे त्याला जास्त मते मिळाली. गौरवला प्रेक्षकांशी पटकन कनेक्ट होता येते.
'बिग बॉस १९'च्या घरात सुरुवातीपासून गौरव खन्ना सकारात्मक पाहायला मिळाला. तसेच टीव्ही इंडस्ट्रीतही त्याची चांगली प्रतिमा आहे. कलाकार त्याच्याशी आदराने वागतात.
बिग बॉसमध्ये कोणताही टास्क करताना गौरव खन्नाने ड्रामा केला नाही. खेळात आपले पूर्ण योगदान दिले. Practical गेम खेळला. मारामारीपासून दूर राहीला.
'बिग बॉस १९'च्या संपूर्ण प्रवासात GK शांत आणि संयमी पाहायला मिळाला. त्याने घरात उगाच कोणाशी वाद घातला नाही. शांतपणे आपली बाजू मांडली. बिग बॉसच्या घरात काही चांगली लोक कमावली. गौरव वादात न पडता मुद्देसूद बोलला जे प्रेक्षकांना आवडते.
गौरव खन्नामध्ये स्पर्धकांच्या भावना समजून घेण्याची क्षमता आहे. त्याने चांगल्या बुद्धिमत्तेने गेम खेळला. टास्कमध्ये सातत्याने चांगली कामगिरी दाखवली. तो मानसिक आणि शारीरिकरित्या फिट राहीला.