Shreya Maskar
मराठमोळ्या प्रणित मोरेचा 'टॉप 3' मध्ये येऊन 'बिग बॉस 19'च्या घरातील प्रवास संपला. प्रणित मोरेला महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून ओळखले जाते.
प्रणित मोरेचे स्वतःचे युट्यूब चॅनेल देखील आहे. प्रणित बॉलिवूड सेलिब्रिटींवर विनोद करतो. त्याची विनोद शैली प्रेक्षकांना खूप आवडते. प्रणित मोरेची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.
प्रणित मोरेचा जन्म मुंबईत झाला. तो केजे सोमय्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची पदवी मिळवली. त्यानंतर त्याने मार्केटिंगमध्ये एमबीए केले.
एमबीए करण्यापूर्वी प्रणित मोरेने एका शोरूममध्ये सेल्स असिस्टंट म्हणून नोकरी केली. तसेच त्याने कॅनव्हास लाफ क्लबच्या ओपन माइक स्पर्धेत भाग घेतला. त्याला कॉमेडीची आवड आधीपासून होती.
प्रणित मोरेचे युट्यूबवर 1.36 मिलियन फॉलोवर्स आहेत. प्रणितचे इंस्टाग्रामवर 989K फॉलोवर्स आहेत. प्रणितचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे.
एमबीए नंतर प्रणितने मिर्ची एफएममध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम केले. त्यानंतर तो युट्यूब, स्टँडअप कॉमेडी याकडे वळला आणि महाराष्ट्रात मोठे नाव कमावले.
मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस १९' साठी प्रणित मोरेला तब्बल 1 लाख ते 2 लाख रुपये मानधन मिळाले. प्रणित मोरे 'बिग बॉस १९'च्या टॉप 5 मध्ये आला.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रणित मोरेची एकूण संपत्ती जवळपास 4-8 कोटी रुपये आहे. तो स्टँडअप कॉमेडी, युट्यूब, कंटेंट क्रिएशन, होस्टिंग आणि ब्रँड जाहिराती यामधून पैसा कमावतो.