Petrol Diesel Price: भुवनेश्वरमध्ये पेट्रोल झालं स्वस्त, कर्नाटकात डिझेलचे दर वाढले, महाराष्ट्रातील स्थिती काय?

Petrol Diesel Price Today: देशभरात आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत चढ-उतार झाले आहेत. कर्नाटकात पेट्रोलचे दर वाढले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या किंमती काय? जाणून घ्या
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On

पेट्रोल डिझेलचे रोज सकाळी नवे दर जाहीर होत असतात. पेट्रोल डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात गेल्या अनेक दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही. परंतु कर्नाटकात डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आणि भुवनेश्वरमध्ये पेट्रोल- डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Price
EPFO चा मोठा निर्णय! कोणत्याही कागदपत्रांशिवाय काढता येणार PF चे ५ लाख रुपये

कर्नाटकात डिझेलच्या किंमती वाढल्या

मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटक सरकारने डिझेलच्या सेल्स टॅक्समध्ये वाढ केली आहे.१ एप्रिलपासून ही वाढ केली आहे. दरम्यान, याचा परिणाम थेट डिझेलच्या किंमतीवर झाला आहे. सेल्स टॅक्समध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. पेट्रोलच्या किंमती मात्र स्थिर आहेत. कर्नाटकात डिझेल ८८.९९ रुपयांना विकले जात आहे तर पेट्रोलची किंमत १०२.९२ रुपये आहे.

भुवनेश्वरमध्ये इंधनाचे दर घसरले

भुवनेश्वरमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात झाली आहे. पेट्रोल डिझेलचे दर ०.२८ पैशांनी कमी झाले आहेत. पेट्रोलची किंमत १०१.११ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.६९ रुपये आहे.

Petrol Diesel Price
New Pension Scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना; पुढच्या महिन्यापासून होणार सुरू, काय मिळतील लाभ?

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर (Maharashtra Petrol Diesel Price)

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.

मुंबईत पेट्रोल १०३.५० रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.०३ रुपये आहे.

पुण्यात पेट्रोल १०४.०२ रुपयांना विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.५५ रुपये आहे.

नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.२४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.७७ रुपये आहे.

नागपूरमध्ये पेट्रोल १०४.०२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.५८ रुपये आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल १०४.५३ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.०५ रुपये आहे.

Petrol Diesel Price
Chandrapur Petrol Pump : नोटा दिल्या नाही म्हणून गाडीत भरलेले पेट्रोल काढले; पेट्रोल पंपावर दहा रुपयांचे नाणे नाकारले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com