Jalna News : घोषणा देत शिक्षकांनी अंगावर डिझेल ओतलं, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Jalna Teacher Attempts Self Immolation : जालन्यात आज अंशतः अनुदानित शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यादरम्यान काही शिक्षकांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
District Collector office Aided teachers attempted self immolation
District Collector office Aided teachers attempted self immolation Saam Tv News
Published On

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना : जालन्यात अंशतः अनुदानित शिक्षकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शिक्षकांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. जालना जिल्ह्यातील अंशत: अनुदानित शिक्षकांनी आज विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यादरम्यान काही शिक्षकांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या चार शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

चार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

जालन्यात आज अंशतः अनुदानित शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यादरम्यान काही शिक्षकांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यानंतर पोलिसांनी या आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे. यात काही महिला शिक्षकांचा देखील समावेश होता. यावेळी शिक्षकांकडून १०० टक्के अनुदान मिळालच पाहिजे अशा घोषणा लावण्यात आल्या.

District Collector office Aided teachers attempted self immolation
त्याची माफी मागायची इच्छा नाही, पण तो बाहेर येईलच ना; शिवसेना नेत्याने कुणाल कामराला दम भरला

सामूहिक आत्मदहनाचा दिला होता इशारा

जालन्यात अंशतः अनुदानित शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी जालना शहरातील अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला .शिंदे सरकारच्या काळामध्ये ५२ हजार शिक्षकांना वाढीव २० टक्क्यांचा टप्पा मंजूर केला होता. मात्र, या अधिवेशनामध्ये त्यासाठी कोणतेही तरतूद न मिळाल्याने राज्यभरातील अंशतः अनुदानित शिक्षक आक्रमक झाले आहेत. आज अंशतः अनुदानित शिक्षकांनी आक्रमक होत जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला असून सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता.

District Collector office Aided teachers attempted self immolation
Disha Salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरण: आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंनाही आरोपी करा, सतीश सालियन अन् वकील निलेश ओझांची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com