Maharashtra Live News Update: इंडिगोच्या विमानसेवेच्या गोंधळाचा फटका नागपुरात पोहचणाऱ्या मंत्री-आमदारांना

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज सोमवार, दिनांक ८ डिसेंबर २०२५, आजपासून हिवाळी अधिवेशन, राज्यात थंडी गायब, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Maharashtra Live News Update: इंडिगोच्या विमानसेवेच्या गोंधळाचा फटका नागपुरात पोहचणाऱ्या मंत्री-आमदारांना

- इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेमुळे मंत्री,आमदार नागपुरात पोहचले चार्टर विमान आणि रेल्वेने

- नागपुरात रविवारी एकूण पाच चार्टर विमान पोहचले

- राज्यपाल,मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही मंत्र्यांना सोबत घेऊन नागपुरात चार्टर विमानाने पोहचले

- तर गिरीश महाजन,हसन मुश्रीफ, संजय राठोड, भास्कर जाधव यांच्यासह अनेक आमदार रेल्वेने नागपुरात पोहचले

- रविवारी दिवसभरात नागपुरात येणारी -जाणारी इंडिगोची 19 उड्डाणे रद्द झाली

- इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेमुळे अधिवेशन संपल्यानंतर 14 आणि 15 डिसेंबरला नागपुरातून पुणे आणि मुंबईसाठी विशेष रेल्वे गाड्यांचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठवण्यात आल्याची माहिती सभापती राम शिंदे यांनी दिली

-

गारठा आजपासून वाढणार, पारा चार दिवस ८ ते ११ अंश राहणार असल्याचा हवामान अभ्यासकाचा अंदाज

जळगाव शहरासह जिल्ह्यात ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत किमान तापमान ८ ते ११ अंश राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे जोरात मध्य महाराष्ट्राकडे वाहत असल्याने गारठा अधिक वाढल्याचे जाणवते.वातावरण अंधुक किंवा ढगाळ .भौगोलिक भाषेत या स्थितीला 'हेझ' म्हणतात.

धुके व कोरड्या वाऱ्यांमुळे जळगावचा पारा आज पासून पुढील चार दिवस ८ ते ११ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. अर्थात, थंडीचा गारठा वाढेल. रविवारी पारा १२.२ अंशांवर होता. सोमवारी रेडिएटिव्ह फॉगमुळे दृश्यमानता ४०० मीटरपर्यंत खाली येईल आणि सरासरी किमान तापमान ११ अंशांपेक्षाही खाली येऊ शकते, असा स्थानिक हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात माझा पक्ष ज्या पक्षासोबत जातो त्यांची सत्ता येते ज्याच्या विरोधात जातो त्यांचा सत्यानाश होतो - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

कल्याण पूर्वमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर मेळाव्यात केंद्रीय मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण राजकीय संदेश देत महायुतीत आपल्या पक्षाची निर्णायक भूमिका अधोरेखित केली.

मेळाव्यात भाषण करताना आठवले म्हणाले, महाराष्ट्रात माझा पक्ष ज्या पक्षासोबत जातो त्यांची सत्ता येते; आणि ज्यांच्या विरोधात जातो त्यांचा सत्यानाश होतो. हा ३०–३५ वर्षांचा इतिहास आहे.

ते पुढे म्हणाले की, आरपीआयने आदी काँग्रेससोबत हातमिळवणी केली तेव्हा त्यांची सत्ता आली होती, आणि आज भाजप-शिवसेना सोबत आल्याने महायुतीची सत्ता स्थिर आहे.

Maharashtra Live News Update: आजपासून हिवाळी अधिवेशन, नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापणार

नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन तयार आहे. राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com