VitaminD Risk: Vitamin D च्या अतिसेवनाने थेट किडनीवर परिणाम, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा, वाचा

Kidney Health: व्हिटॅमिन डीचे अति सेवन केल्यास किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे चेन्नईतील नेफ्रोलॉजिस्टचे मत. हायपरकॅल्सेमिया, किडनी स्टोन आणि फेल्युअरची शक्यता वाढते. लक्षणे व धोके जाणून घ्या.
Kidney Health
VitaminD Riskgoogle
Published On

शरीरात बदलत्या जीवनशैलीमुळे व्हिटॅमिन्सची कमी सातत्याने जाणवत असते. अशा वेळेस अनेक लोक त्यांच्या गोळ्या सेवनाकडे वळतात. महीनाभर किंवा काहीजण ६ महिने या कालावधीपर्यंत या गोळ्या खात असतात. याचा परिणाम तुमच्या किडनीवर होतो, असे चेनईतील प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉ. नविनाथ एम यांनी स्पष्ट केले आहे. पुढे आपण याची लक्षणे, कारणे, शरीरावर होणारे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत.

हाडं, दात आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असलं तरी त्याचं जास्त प्रमाण शरीरासाठी घातक ठरू शकतं आणि किडनीवर कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता वाढते. थंडीच्या दिवसात सूर्यप्रकाश कमी मिळणं किंवा आरोग्य सुधारण्यासाठी जण स्वतःहून व्हिटॅमिन डीची सप्लिमेंट्स घेण्याकडे वळले आहेत. मात्र, या सप्लिमेंट्सचे चुकीचे किंवा अति सेवन वाढत असल्याने ओव्हरडोचीज समस्या गंभीर होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Kidney Health
Instant Noodles: आठवड्यातून दोन वेळा नूडल्स खाताय? आताच व्हा सावध , अन्यथा 'या' गंभीर आजाराचा वाढेल धोका

डॉक्टरांच्या मते, प्रौढ व्यक्तींना दररोज फक्त 400 ते 1,000 IU इतकेच व्हिटॅमिन डी आवश्यक असते. मात्र एखादी व्यक्ती दीर्घकाळ दररोज 4,000 IU पेक्षा जास्त किंवा 8,000 ते 12,000 IU इतक्या उच्च प्रमाणात घेत राहिली तर शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी धोकादायकरीत्या वाढते. अनेकदा 60,000 IU असलेल्या आठवड्यातून एकदाच घ्यायच्या कॅप्सूल्स चुकून रोज घेतल्या जातात आणि त्यामुळेही विषबाधा होते. जास्त प्रमाणातील व्हिटॅमिन डीमुळे रक्तात कॅल्शियमचे प्रमाण अनियंत्रितरीत्या वाढते, ज्याला 'हायपरकॅल्सेमिया' म्हणतात. या अतिरिक्त कॅल्शियमची निर्मिती किडनीला सतत फिल्टर करावी लागते, त्यामुळे किडनीवर मोठा ताण येतो.

कॅल्शियमचे मोठ्या प्रमाणात फिल्ट्रेशन करताना किडनीमध्ये कॅल्शियमचा साठा वाढतो. कालांतराने हा साठा किडनी स्टोनमध्ये किंवा 'नेफ्रोकॅल्सिनोसिस' नावाच्या गंभीर अवस्थेत बदलतात. अशा परिस्थितीत किडनीचे सूक्ष्म फिल्टरिंग यंत्रणाच नुकसान होऊन 'अक्यूट किडनी इन्ज्युरी' किंवा काही वेळा कायमस्वरूपी किडनी फेल्युअर होण्याचा धोका निर्माण होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हिटॅमिन डीच्या अति प्रमाणामुळे लक्षणे त्वरित दिसून येत नाहीत. मात्र, जेव्हा लक्षणे दिसू लागतात, तेव्हा उलटी, मळमळ, सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, स्नायू अशक्तपणा, गोंधळल्यासारखे वाटणे, थकवा, पाठीत किंवा कंबरेच्या बाजूला वेदना अशी चिन्हे आढळू शकतात. नुकसान जास्त झाल्यास पाय सूजणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि अखेर किडनी फेल्युअरची स्पष्ट लक्षणे दिसू शकतात.

टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Kidney Health
Vitamin B12 Symptoms: B12 कमी होण्यामागची कारणे कोणती? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती, वाचा लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com